'तुला पाहते रे' मालिकेच्या कलाकारांच 'Rap चिक साँग'

सोशल मीडियावर वायरल 

Updated: Jan 18, 2019, 11:57 AM IST
 'तुला पाहते रे' मालिकेच्या कलाकारांच 'Rap चिक साँग' title=

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे'मध्ये ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच अगदी शाही थाटात लग्न पार पडलं. या तीन दिवसाच्या शाही विवाहसोहळ्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. एवढंच नव्हे तर या शाही सोहळ्यानंतर ही मालिकी TRP मीटरमध्ये नंबर 1 ला आली. असं सगळं असताना या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. या व्हिडिओ मालिकेतील सर्व कलाकार म्हणजे सरंजामे सर, ईशा निमकर, मायरा, जयदेव, सोनिया, झेंडे यासारखे सर्व कलाकार उपस्थित असून त्यांनी एक Rap चिक साँग तयार केलं असून ते सध्या प्रेक्षकांच्या खूप पसंतीला पडत आहे. या गाण्यात मायराने हटके रॅप साँग तयार केलं आहे. आणि या गाण्याला इतर कलाकारांनी चांगलीच साथ दिली आहे. 

तुला पाहते रे या मालिकेत विक्रांत सरंजामे यांनी आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या ईशा निमकरसोबत लग्न केलं आहे. या लग्नाला सुरूवातीला खूप विरोध झाला. पण त्यानंतर कुटुंबातील मंडळींनी या लग्नाला होकार दिला. आता ईशा सरंजामे घरात आहे. तेथील शाही गोष्टी ती शिकत आहे. असं असतानाच जालिंदर पुन्हा एकदा ईशाला त्रास देण्यास सज्ज झाला आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी ईशाला चाफ्याची फुलं पाठवतात आणि पुन्हा एकदा विक्रांत आणि झेंडेचा ताप वाढतो. सध्या ही मालिका वेगवेगळं वळण घेत आहे. 

विक्रांतच्या वरच्या खोलीत नेमकं काय दडलंय? हा प्रश्न ईशाला पडतो. त्यासंदर्भात ती विक्रांतला विचारते देखील पण विक्रांत याबाबत नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच आता विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीबाबत देखील आता खुलासा होईल अशी आशा प्रेक्षकांना आहे.