बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे.

Updated: Jun 23, 2017, 03:09 PM IST
बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर title=

मुंबई : दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे, वीकेंडपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल आहेत. मात्र सलमानच्या ट्युबलाईटचा प्रकाश मंद असल्याची प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिळत आहे.

हा सिनेमा जगभऱात तब्बल 5 हजार 550 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. भारतात हा सिनेमा 4 हजार 350 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा ओपनिंग डेला 30 ते 35 कोटींपर्यंतची कमाई करेलं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

1962 साली झालेल्या भारत आणि चीन युध्दावर हा सिनेमा आधारित आहे.सिनेमात पुन्हा एकदा वेगळा अंदाज त्याच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. सलमान खानचा ट्युबलाईट कोणत्या नव्या विक्रमांना गवसणी घालतो याकडेचं सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे.