आजपासून सिनेमांची शूटिंग थांबणार, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

आजपासून सिनेमांचं चित्रीकरण बंद; का घेतला इतका मोठा निर्णय?   

Updated: Aug 1, 2022, 02:21 PM IST
आजपासून सिनेमांची शूटिंग थांबणार, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय  title=

मुंबई : सिनेमांच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्रेक्षकांना कळू लागल्या आहेत. ऍक्शन, प्रेमकथा, महिलांवर आधारित सिनेमे, बायोपिक इत्यादी विषयांवर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. सिनेमांमुळे अनेकांना त्यांची वाट उमगली, तर सिनेमांमुळे अनेकांचं नशीब उजळले. एवढंच नाही तर, अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून इंडस्ट्री गाजवली. पण आता सिनेमांच्या शूटिंगला ब्रेक लागल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. मराठी सिनेमे, बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असताना, सिनेमांचं शुटिंग थांबणार आहे.  

दरम्यान, आज टॉलिवूड सिनेमे फक्त साऊथसाठीच मर्यादित नसून प्रत्येक सिनेमांची कथा चाहत्यांच्या मनात घर करत आहेत. अस असताना टॉलिवूड निर्मात्यांनी आजपासून शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉलिवूड निर्मात्यांनी सोमवारपासून सिनेमांचे शूटिंग थांबवणार असल्याची घोषणा फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने रविवारी केली. 

हैदराबाद येथे झालेल्या फिल्म चेंबरच्या सभेत तेलगू प्रोड्यूसर्स गिल्ड (ATPG) ने सिनेमा शुटिंग 1 ऑगस्टपासून थांबवण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

सुप्रसिद्ध निर्माते दिल राजू म्हणाले की, सर्व समस्यांवर चर्चा करतील आणि जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत शूटिंग पुन्हा सुरू होणार नाही... असा निर्णय घेण्यात आला आहे. 

सिनेमा चेंबरचे नवे अध्यक्ष बसी रेड्डी म्हणाले की, बैठकीत काही दिवस शूटिंग थांबवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 48 सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नवीन फक्त चित्रपटांची निर्मितीच थांबणार नाही, तर ज्या सिनेमांचं शुटिंग अंतिम टप्प्यात आहेत, त्या सिनेमांचं शुटिंग देखील थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मात्र, हैदराबादमधील इतर भाषांमधील सिनेमांच्या शूटिंगवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. काही महत्त्वाच्या कारणांमुळे टॉलिवूड सिनेमांचं शुटिंग थांबवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 

'या' कारणांमुळे घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय
टॉलिवूड सिनेसृष्टीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. दिल राजू यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटगृहांमध्ये संरक्षणाचा अभाव, सिनेमाच्या तिकिटांच्या किमती, ओटीटीवर नवीन रिलीज आणि उत्पादन खर्चात वाढ अशा विविध समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.