नवी दिल्ली : अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा खूप दिवसांनी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी घेऊन आलेला ठरला. एका मागोमाग एक फ्लॉप सिनेमे पाहिल्यानंतर या लांब विकेंडला प्रेक्षकांना उत्तम कथानक असलेला सिनेमा पाहायला मिळाला.
आणि अक्षय कुमारच्या या हिट सिनेमा मागचं रहस्य आहे त्याच्यावर चाहत्यांचं असलेलं प्रेम. रिलिजच्या अवघ्या पाच दिवसांतच या सिनेमाने तब्बल ८३.४५ करोड रुपयांची कमाई केली आहे. ११ ऑगस्टला रिलिज झालेल्या या सिनेमाने मंगळवारी म्हणजे स्वातंत्र्यता दिनादिवशी २० करोड रुपयांची कमाई केली. रिलीजच्या पाचव्या दिवशी २० करोड ची कमाई केलेल्या या सिनेमाने तब्बल ८३.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा अशाच पद्धतीने गाजत असला तर तो नक्कीच १०० कोटी रुपयांचा आकडा गाठेल यात शंका नाही.
या अगोदर अक्षयचा सिनेमा एवढा मोठा आकडा गाठू शकलेला नाही. त्यामुळे जर हा आकडा गाठला तर ही सर्वात मोठी बाजी असेल. आतापर्यंत केलेली कमाई बघता असा निष्कर्ष लावला जात आहे की, हा सिनेमा शाहरूख, सलमान सारख्या मोठ्या स्टारच्या या वर्षात रिलीज झालेल्या सिनेमांना सर्वात मोठी टक्कर देऊ शकते.
अक्षय कुमारच्या या सिनेमाचा वाढता ग्राफ बघता फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरूण आदर्श देखील हैराण आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमा अगोदर अनेक दिग्गज कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र त्यांना जेवढं यश मिळालं तेवढं यश अद्याप कोणत्याही सिनेमाला मिळालेलं नाही. आणि त्याला एकमेव कारण म्हणजे या सिनेमाची कथा.