TMKOC | "माझ्या सन्मानाला धक्का पोहोचवण्यासाठी 13 मिनिटेही लागली नाहीत", मुनमुन संतापली

मुनमुनने (munmun dutta)  या ट्रोल गँगला सोशल मीडियाद्वारे (Social Media) पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे.

Updated: Sep 12, 2021, 09:19 PM IST
TMKOC | "माझ्या सन्मानाला धक्का पोहोचवण्यासाठी 13 मिनिटेही लागली नाहीत", मुनमुन संतापली title=

मुंबई : 'तारक मेहता' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम 'बबिता जी' अर्थात मुनमुन दत्ताला (Munmun Dutta) अनेक दिवसांपासून सहकारी कलाकार राज अनाडकटला (Raj Anadkat)  डेट करत असल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरुन मुनमुनला ट्रोल केलं जात आहे. यावरुन अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. मुनमुनने या ट्रोल गँगला सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांच मनोरंजन करतेय. मात्र माझ्या सन्मानाला ठेच पोहचवण्यासाठी 13 मिनिटंही लागली नाहीत", असं म्हणत मुनमुनने संताप व्यक्त केला. (Tmkoc fame babita aka munmun dutta slams trolls over to rumours about to dating with tappu aka raj anadkat)   

मुनमुन काय म्हणाली? 
 
मुनमुनने ही नाराजी तिच्याबद्दल सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांबाबत व्यक्त केली आहे. मुनमुनने काही वेळापूर्वीच इन्स्टाग्रामवर 2 पोस्ट शेअर केल्या. मुनमुनने या पोस्टमधून सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्यांना आणि वयाच्या मुद्द्यावरुन महिलांना सतत लक्ष्य करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. 

"मला तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या. पण तुम्ही कमेंटमधून तुमची पातळी दाखवून दिली. तसेच या कमेंट्सच्या माध्यमातून हे सिद्ध झालं की तथाकथित 'सुशिक्षित' झाल्यानंतर आपण अशा समाजाचा भाग आहोत, जे संकुचित विचारसरणीचे आहेत. महिलांना नेहमीच विनोदासाठी त्यांच्या वयावरुन टीका केली जाते. या विनोदामुळे एखाद्या महिलेवर काय परिस्थिती ओढावते, या टीकेमुळे काहींना प्रेरणा मिळते तर काहीचं मानसिक खच्चीकरण होतं. आपण करत असलेल्या टीका टिप्पणींमुळे समोरच्यावर काय परिणाम होईल, याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांच मनोरंजन करतेय. मात्र माझ्या सन्मानाला ठेच पोहचवण्यासाठी 13 मिनिटंही लागली नाहीत", असं म्हणत मुनमुनने संताप व्यक्त केला. 

"तर पुढच्या वेळेस कोणी इतका उदास असेल की ज्याला स्वतःचा जीव घ्यायचा आहे, मग थांबून एकदा विचार करा की, तुमचे शब्द त्याला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडणार तर नाहीत ना. आज स्वतःला भारताची मुलगी म्हणून घेताना लाज वाटते", असं मुनमुनने आपल्या पोस्टमध्ये म्हंटलंय.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@mmoonstar)