Titanic fame Kate Winslet : ऑस्कर अवॉर्डची कोणालाही ओळख करुण देण्याची गरज नाही. ऑस्कर हा पुरस्कार जगातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे असं म्हणता येईल. टॉलिवूड असो, बॉलिवूड असो किंवा मग हॉलिवूड यापैकी कोणत्या चित्रपटसृष्टीत असलेल्या कलाकाराला हा पुरस्कार आपल्याला मिळायला हवं असं वाटतंय पण तुम्हाला माहितीये का? 'टाइटॅनिक' फेम अभिनेत्री केट विंसलेट तर तिला मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी ही बाथरुममध्ये ठेवते. दरम्यान, त्या मागचं जे कारण आहे ते खूप हटके आहे. याचा खुलासा कॅट विंसलेटनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
केट विंसलेटनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेला हा खुलासा कळल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. केट विंसलेटनं सांगितलं की 'जेव्हा पण कोणी बाथरुममध्ये जातं तेव्हा ती व्यक्ती ऑस्करसोबत आरश्यात वेळ घालवू शकते. त्यातही असं कोणी केलं हे तुम्ही नेहमी लगेच सांगू शकतात, कारण ते फ्लश करतात आणि मग आणखी पाच मिनिटं थांबतात. थोडक्यात तिचं असं म्हणणं आहे की प्रत्येक येणाऱ्या व्यक्ती त्याला उचलतात. त्यातही असं कोण करत हे कळतं कारण ते फ्लश केल्यानंतर तिथे थोडावेळ थांबतात. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्यांचे गाल हे थोडे गुलाबी असतात. त्यांना आनंद झालेला असतो.'
केटला 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सेंस एंड सेंसिबिलिटी' साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा तिच्या करिअरचा पहिला आणि एकमेव असा ऑस्कर पुरस्कार आहे.
केटच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर ती 'द रिजीम' नावाच्या मिनी-सीरिजमध्ये दिसणार आहे. या मिनी-सीरिजमध्ये ती फक्त अभिनय करत नाही तर त्यासोबत ती प्रोड्यूसर म्हणून देखील काम करणार आहे.
हेही वाचा : आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनमध्ये पापाराझींना पाहताच राज ठाकरेंनी दिला इशारा!
केटच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टाइटॅनिक' मध्ये रोज ही भूमिका साकारली होती. केटनं अनेक लोकप्रिय अशा हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ च्या सीक्वल म्हणजेच ‘अवतार 2’ मध्ये देखील ती दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सगळ्यांनी स्तुती केली होती.