ट्रोल झालेल्या अभिषेक बच्चनचं नेटीझन्सना सडेतोड उत्तर

अभिषेकने दिलेलं उत्तर अचंबित करणारं 

Updated: Dec 10, 2019, 08:50 AM IST
ट्रोल झालेल्या अभिषेक बच्चनचं नेटीझन्सना सडेतोड उत्तर  title=

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्रोल करणं हे नेटीझन्सचं आवडीचं काम. अभिनेता अभिषेक बच्चनला अनेकदा टार्गेटकरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. खासकरून ट्विटरवर हे चित्र पाहायला मिळतं. अनेकदा अभिषेक बच्चन ट्रोल करणाऱ्यांना कोणतीच किंमत न देता त्यांना अतिशय मजेशीर आणि गंमतीशीर अशी उत्तर देताना दिसतो. पण यावेळी मात्र अभिषेकने नेटीझन्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

ट्विटरतींनी अभिषेकला अतिशय खासगी असा प्रश्न विचारला आहे. '3 वर्ष काही काम न करता, सुट्यांवर कुठून पैसे खर्च करतोस?' या प्रश्नाला अभिषेक बच्चन अतिशय स्पष्ट उत्तर देतो. अभिषेक म्हणतो की,'मी अनेक व्यवसाय देखील करतो. त्यातील एक व्यवसाय म्हणजे कबड्डी टीम. जयपूर पिंक पॅँर्थर हा संघ माझा आहे. '

त्यानंतर एका ट्विटरतीने विचारलं की,'अनुराग कश्यप अभिषेक बच्चनला कसं कास्ट करू शकतो? जेव्हा त्याने नवाजुद्दीन सिद्दीकी, विक्की कौशल, मनोज वाजपेयी आणि इतर लोकांसोबत काम केलं आहे.' यावेळी अभिषेक उत्तर देतो की,'हो, तो मला फिल्म स्टार बोलवतो.' त्यानंतर ट्विटरवर आणखी एक कमेंट येते की,'स्टार म्हणजे मुव्ही स्टारचा मुलगा.' 

या अशा प्रकारे सोशल मीडियावर अभिषेक बच्चनला नेटीझन्स प्रश्न विचारत असतात. अभिषेक बच्चन ट्रोलिंगला न जुमानता एका युजरला सडेतोड उत्तर दिल आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिषेक बच्चन सिनेसृष्टीपासून लांब आहे. 

#MondayMotivation असा हॅशटॅग वापरत अभिषेकने सोमवारी एक सकारात्मक विचार ट्विटरवर शेअर केला. यावर देखील त्याला ट्रोल करण्यात आलं. Happy Monday म्हणणाऱ्या अभिषेकला बेरोजगार असल्यामुळे तुला सोमवारचा आनंद होत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलंय.