लवकरच 'टायगर जिंदा है' चित्रपट ३०० कोटी क्लबमध्ये

सलमान खानची जादू पुन्हा बॉक्सऑफिसवर पसरली आहे.

Updated: Jan 2, 2018, 03:29 PM IST
लवकरच 'टायगर जिंदा है' चित्रपट  ३००  कोटी  क्लबमध्ये  title=

मुंबई : सलमान खानची जादू पुन्हा बॉक्सऑफिसवर पसरली आहे.

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चित्रपट २२ डिसेंबरला रिलीज झाला आणि बघता बघता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला जमावयला सुरूवात केली आहे. 

३०० कोटींचा टप्पा 

सध्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने २५० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता लवकरच ३०० कोटींचा टप्पा आवाक्यात येण्याची शक्यता आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीचा जलवा तब्बल ५ वर्षानंतर रसिकांना पाहता येणार होता. त्यामुळे सहाजिकच या जोडीच्या चाहत्यांमध्ये 'टायगर जिंदा है' बाबत उत्सुकता होती. 

ट्रेड अ‍ॅनालिसट तरण आदर्श यांनी 'टायगर जिंदा है' या चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट ३०० कोटीचा गल्ला जमवेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.  

किती हिंदी चित्रपटांनी पार केला ३०० कोटींचा टप्पा ? 

 'पिके'  (२०१४)
दबंग (२०१५)
सुल्तान (२०१६) 
बाहुबली या मूळचा तेलगू चित्रपट हिंदी मध्ये डब करण्यात आला होता. या चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमावला होता.  

आता सलमानचा तिसरा चित्रपट 'टायगर जिंदा है' ३०० कोटींचा गल्ला जमा करण्याची शक्यता आहे. 

'टायगर' ला प्रतिसाद 

'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे ' टायगर जिंदा है'. २२ तारखेला हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरूवातीला चित्रपटाच्या ट्रेलरला त्यापाठोपाठ गाण्यांना प्रतिसाद मिळाला. 

युट्युबवरही गाण्याने लोकप्रियतेचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.