Tiger Shroff ने शेअर केला शर्टलेस फोटो, फोटोवर दिशा पटनी कमेंन्ट करत म्हणाली...

टायगरचा  फोटो इंस्टाग्रामवर अवघ्या काही तासात तुफान व्हायरल होत आहे

Updated: Apr 7, 2021, 05:04 PM IST
Tiger Shroff ने शेअर केला शर्टलेस फोटो, फोटोवर दिशा पटनी कमेंन्ट करत म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या फिटनेस आणि जबरदस्त स्टंटसाठी ओळखला जातो. नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एन्जॉय करताना दिसत आहे.

त्याने आपल्या इंस्टाग्रामवरुन एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये टायगर समुद्रकिनार्‍यावर, सनग्लासेससह पोज देताना दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच पसंतीस उतरत आहे. शेअर केलेला हा फोटो इंस्टाग्रामवर अवघ्या काही तासात तुफान व्हायरल होत आहे, या फोटोला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत एक आकर्षित असं कॅप्शन दिलं आहे. तसंच बॉलिवूडचे अनेक कलाकार या फोटोवर कमेंट करत आहेत. फोटोवर त्याची बहीण कृष्णा श्रॉफने देखील कमेंन्ट केली आहे की, ''सुपरह्युमॅन जेनेटिक्स प्लस  दररोज भरपूर मेहनत घेतो त्याला कोणीच पराभूत करू शकत नाही.'' त्याचबरोबर अभिनेत्री दिशा पाटनीने या फोटोला फायर इमोजिस शेअर करत कमेंन्ट दिली आहे.

टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात कृती सेनॉन त्याच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वशु भगनानी केली आहे. विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. यापूर्वी ही जोडी 'हीरोपंती' मध्ये दिसली होती.