मुंबई : प्रेम एक अशी गोष्ट आहे जी फार कमी लोकांच्या भाग्यात लिहिलेली असते. पहिल्या नजरेत ती व्यक्ती आवडू लागते पण त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करणं राहून जातं. असचं काही झालं आहे अभिनेता टायगर श्रॉफसोबत. टायगर सध्या अभिनेत्री दिशा पटनीला डेट करत असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. पण एकेकाळी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही टायगरची क्रश होती. पण टायगरने कधीही आपल्या भावना श्रद्धाकडे व्यक्त केल्या नाहीत.
टायगर आणि श्रद्धा लवकरच 'बागी ३' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ६ मार्च रोजी 'बागी ३' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान टायगरने मोठा खुलासा केला. शाळेत असताना श्रद्धा टायगरची क्रश होती. पण या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्यामध्ये बिलकूल हिंमत नसल्याचं टायगरने यावेळेस सांगितले.
टायगरच्या आधी अभिनेता वरूण धवनने देखील सांगितले होते की कॉलेजच्या दिवसात श्रद्धा कपूर त्याची क्रश होती. 'स्ट्रीट डान्सर ३ डी' च्या प्रमोशन दरम्यान त्याने सांगितले होते. सध्या वरून त्याची मैत्रीण नताशा दलालला डेट करत आहे. शिवाय त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरत आहेत.