'हे' Song अजून नाही ऐकलं? बडे मियाँ छोटे मियाँ मधील हेच गाणं आता सगळीकडे वाजणार

निर्मात्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मस्त मलंग झूम'चे शीर्षक गीत रिलीज केले होते. बॉलीवूड चा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार हे दोघे यातून पहायला मिळाले असताना आता पुन्हा एकदा ‘वल्लाह हबीबी’ हे गाणं नक्कीच खास ठरणार आहे.

Updated: Mar 14, 2024, 06:22 PM IST
'हे' Song अजून नाही ऐकलं? बडे मियाँ छोटे मियाँ मधील  हेच गाणं आता सगळीकडे वाजणार  title=

मुंबई : आगामी ॲक्शनर 'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर बहुप्रतिक्षित गाणे ‘वल्लाह हबीबी’ आउट केलं असून ज्यामध्ये बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि अष्टपैलू अभिनेत्री मानुषी छिल्लर दिसणार आहेत. टायगर श्रॉफ आणि त्याच्या अतुलनीय डान्स मूव्ह यातून बघायला मिळणार आहेत. अलाया एफ आणि अक्षय कुमार देखील या गाण्यात दिसणार आहेत हे गाणं चार्टबस्टर ठरणार यात शंका नाही. 

निर्मात्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मस्त मलंग झूम'चे शीर्षक गीत रिलीज केले होते. बॉलीवूड चा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार हे दोघे यातून पहायला मिळाले असताना आता पुन्हा एकदा ‘वल्लाह हबीबी’ हे गाणं नक्कीच खास ठरणार आहे.‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेला एक आगामी ॲक्शन पॅक चित्रपट आहे. जो या ईदला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स यांनी केली आहे.बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट "बडे मियाँ छोटे मियाँ" च्या रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. 

पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित, बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे खिलाडी कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार, टायगर श्रॉफ, या ईदमध्ये त्यांचा 'टायगर इफेक्ट' प्रदर्शित करत असलेल्या रोमांचकारी राइडसाठी तयार व्हा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपुर्वी 2024 च्या रिअल ॲक्शन फिल्म बडे मियाँ छोटे मियाँच काउंटडाऊन सुरू होताच निर्मात्यांनी “मेकिंग ऑफ द रिअल ॲक्शन फिल्म” नावाचा पहिला अधिकृत BTS व्हिडिओ रिलीज करून प्रेक्षकांना एक खास सरप्राइज दिलं होतं. धमाकेदार ॲक्शन आणि अक्षय कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांचे अफलातून ऑक्टेन स्टंट यातून दिसणार आहे. टायगर ने त्याचा सोशल मीडिया वर हा खास व्हिडिओ शेयर केला होता.