अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर 'ही' अभिनेत्री घेतेय घटस्फोट; नात्यात नेमकं कुठं बिनसलं?

Kaisi Yeh Yaariaan Fame Actress Divorce News : छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय अभिनेत्री लग्नाच्या चार वर्षात घेणार घटस्फोट?

दिक्षा पाटील | Updated: May 31, 2024, 02:01 PM IST
अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर 'ही' अभिनेत्री घेतेय घटस्फोट; नात्यात नेमकं कुठं बिनसलं? title=
(Photo Credit : Social Media)

Kaisi Yeh Yaariaan Fame Actress Divorce News : 'कैसी ये यारियां' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री निती टेलरनं सगळ्यांच्या मनात घर करून आहे. नितीची स्माईल अनेक तरुणांना वेड लावताना दिसते. नितीचे लाखो चाहते आहेत. तर सोशल मीडियावर निती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. या सगळ्यात नितीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या बदलांमुळे तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगू लागली आहे. नितीनं 2020 मध्ये आर्मी ऑफिसर परीक्षित बावाशी लग्न केलं होतं. आता लग्नाच्या चार वर्षात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

या अफवाह तेव्हा सुरु झाल्या जेव्हा नितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती परीक्षित बावाला अनफॉलो केलं आहे. त्यानंतर परीक्षितनं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट ही डिअॅक्टिव्ह केलं होतं. तर आता तो पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर परतला आहे. मात्र, त्यानं आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे प्रायव्हेट केलं आहे. इतकंच नाही तर नितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती परीक्षितचं आडनाव आता काढून टाकलं आहे. एवढंच नाही तर नितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनेक फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत, ज्यात तिचा नवरा आणि सासरचे लोक दिसत होते. त्याशिवाय परीक्षितच्या वाढदिवसाची पोस्ट कोणाला पाहायला मिळाली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना जास्त भीती वाटू लागली आहे. असं वाटतंय की निती तिच्या सांसारिक आयुष्यात आनंदी नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नितीचे चाहते अचानक झालेल्या या सगळ्या गोष्टींना समजू शकलेले नाही आणि त्यामुळे चिंतेत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'मला कळत नाही आहे की त्यांच्यात नक्की काय बिनसलं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'झलकनंतर ती तिच्या सासरच्यांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी देखील गेली होती. सोशल मीडियावर काहीही खरं नसतं.'

हेही वाचा : अमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभव

दरम्यान, नितीविषयी बोलायचं झालं तर तिनं 2020 मध्ये परीक्षित बावाशी लग्न केलं केलं. त्या आधी निती आणि परीक्षित ही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. लग्न झाल्यानंतर नितीचा नवरा अर्थात परीक्षितला त्याच्या लूक्सवरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. खरंतर तलाकच्या चर्चांमध्ये निती टेलर किंवा परीक्षित या दोघांकडून कोणतीही माहिती समोर आली नाही. त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.