करोडोंची कमाई करणारा अभिनेता आज भांडी घासतोय! व्हिडीओ होतोय व्हायरल

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने नुकताच 100 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट केला आहे. पण सध्या त्याची अशी अवस्था पाहून वाईट वाटेल.

Updated: Sep 26, 2023, 06:12 PM IST
करोडोंची कमाई करणारा अभिनेता आज भांडी घासतोय! व्हिडीओ होतोय व्हायरल title=

मुंबई : आज कोणाला अभिनेता व्हायचं नाही? त्यांची लाईफस्टाईल आणि स्टेटस सर्वसामान्यांसाठी स्वप्नासारखा आहे. प्रत्येकाला सेलिब्रेटीसारखं लोकप्रिय व्हायचं असतं, मात्र यासाठी खूप मेहनतही करावी लागते. केवळ सेलेब होणं गरजेचं नसतं तर हा दर्जा टिकवणंही खूप अवघड आहे.

सिनेसृष्टीला ब्लॉकबस्टर चित्रपट द्यावे लागतात. तरच एखादा अभिनेता चित्रपटसृष्टीत टिकू शकतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने नुकताच 100 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट केला आहे पण आता तो घराच्या अंगणात भांडी धुताना दिसला आहे.  चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा अभिनेता आणि त्याला भांडी का धुवावी लागली.

ज्या अभिनेत्याचा भांडी धुतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून सुनील ग्रोव्हर आहे. सुनील ग्रोव्हर हा केवळ उत्तम अभिनेताच नाही तर आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेताही आहे. आपल्या कॉमेडी आणि अभिनयाने त्याने फक्त टीव्हीवरच नाही तर फिल्मी दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. मात्र, यावेळी समोर आलेला अभिनेत्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्याचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याच्या घराच्या अंगणात बसून भांडी धुताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्यासमोर काही भांडी ठेवली आहेत जी तो मातीने घासून धुत आहे. अभिनेत्याच्या मागे दिसणारं घर पाहिल्यानंतर हा अभिनेता गावासारख्या ठिकाणी असल्याचं दिसत आहे. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते काळजीत पडले आहेत आणि तो असा भांडी का धुतोय, असा प्रश्न विचारत आहेत.

सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर लोकप्रिय आहे
अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याला 61 लाख लोक फॉलो करतात. अभिनेत्याने नुकताच हा व्हायरल व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की अभिनेत्याची भांडी धुण्यामागील कारण म्हणजे फक्त त्याचा विनोदी बुद्धी आहे. अनेकदा तो असे मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी तो चहा विकताना, भाजी विकताना आणि केश कर्तनालयात काम करताना दिसला होता. सुनील ग्रोव्हर फक्त त्याच्या फॉलोअर्ससाठी असे मजेदार व्हिडिओ बनवत असतो.  आता अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सुनील नुकताच शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात दिसला. या चित्रपटाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे.