प्रसाद ओकसोबत असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत

तुम्ही ओळखलंत का?

Updated: Oct 3, 2019, 03:10 PM IST
प्रसाद ओकसोबत असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत  title=

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रसाद ओक 'हिरकणी' हा आगामी सिनेमा घेऊन सज्ज झाले आहेत. 'कच्चा लिंबू' सिनेमाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रेक्षकांच प्रेम हे कौतुकास्पदच होतं. यानंतर सोनाली कुलकर्णीसोबत प्रसाद ओक 'हिरकणी' हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने एका अभिनेत्रीने तिचा प्रसाद ओक यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

या फोटोतून तिने प्रसाद यांना 'हिरकणी' सिनेमाकरता शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबर तिने प्रसाद ओक यांना पहिल्यांदा केव्हा भेटली त्या क्षणाला उजाळा दिला आहे. मी लहान असताना 'घरकूल' ही मालिका न चुकता पाहात होते. या मालिकेची मी मोठी फॅन होती. या मालिकेत काम करणारे अभिनेता प्रसाद ओक मला खूप आवडायचा. त्याच्यासोबत काढलेला हा फोटो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

As a kid, I used to watch 'घरकुल' everyday and was a huge fan of this guy right here. Also, he is the very first celebrity I've ever met, I gathered the courage to go to him and asked for a picture. Who knew, after two decades or so, I'd hang out and be good friends with him. But the fan in me is still alive and I still look upto him in such awe like a 4 year old. Thank you Prasad Dada for शिवराज्याभिषेक गीत and I absolutely can't wait for हिरकणी. Love and light to you and @manjiri_oak #hirkani #songonloop #fanforever #20yearschallenge #10yearschallegewho? Also, Hi @umesh.kamat , I love you too!

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

ही गोड मुलगी आहे अभिनेत्री मिताली मयेकर. मिताली सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. आपल्या कामाबद्दल बऱ्याच गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मितालीला मालिका आणि सिनेमांमध्ये काम करताना पाहिलं आहे. पण ती चार वर्षांची असताना अभिनेता प्रसाद ओक यांची खूप मोठी फॅन होती. प्रसाद ओक हे पहिले कलाकार आहेत ज्यांच्यासोबत मी फोटो काढला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Retro feels. @prathmeshrangolephotography #smileplease #monochrome

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

प्रसाद ओक आणि मी आता जरी खूप चांगले मित्र असलो तरीही मी सर्वात अगोदर त्यांची खूप मोठी चाहती आहे. प्रसाद यांचा 'हिरकणी' हा आगामी सिनेमा असून त्याला शुभेच्छा दिल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The most fun day of my life so far.. #singaporetrip #universalstudios #tinypandatravels

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

मिताली मयेकरचं नुकतंच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडा झाला आहे. मिताली सोशल मीडियावर ऍक्टिव असून अनेक फोटो शेअर करताना दिसते.