हा मराठमोळा अभिनेता अडकणार विवाहबंधनात

कुणाशी केला साखरपुडा 

हा मराठमोळा अभिनेता अडकणार विवाहबंधनात  title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. दीपवीर पाठोपाठ आता प्रियंका आणि निक जोनस यांचा देखील विवाहसोहळा पार पडला. या सगळ्यात चाहते व्यस्त असताना मराठी सिनेसृष्टीतून देखील लग्नाची एक बातमी आली आहे. मराठी मालिकांमधील एक लोकप्रिय चेहरा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून एक हँडसम चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तो म्हणजे अभिनेता साईंकित कामत. या मालिकेनंतर 'तुझं माझं ब्रेकअप' या हलक्या फुलक्या मालिकेतून साईंकित भेटायला आला. 

हलकी फुलकी कथा असलेली ही मालिका देखील प्रेक्षकांना भावली. या मालिकेनंतर थेट साईंकितच्या साखरपुड्याची बातमी समोल आली. साईंकितचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 

साईंकित हा गोव्याचा असून मानसी हेडाऊ ही वर्धाची आहे. या दोघांनी 30 नोव्हेंबर रोजी साखरपुडा केला आहे. मानसीचा संबंध हा संगीत क्षेत्राशी असून ती गायक शंकर महादेव अॅकॅडमीत संगीत शिक्षिका आहे.