मुंबई : लग्नानंतर अनेक अभिनेत्री अभिनय क्षेत्राचा निरोप घेतात. कारण त्यांच्या असते त्यांच्या येणाऱ्या बाळाची जबाबदारी. अनेक अभिनेत्रीं चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान गरोदर राहिल्यामुळे त्यांना त्यांचं काम अर्ध्यात सोडावं लागलं. तर काहींनी मात्र बेबी बम्ब लपवत चित्रिकरण पूर्ण केलं. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. यावेळी काही अभित्रीने आणि चित्रपटाते निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये वाद देखील झाले. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ते माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल
काजल प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, काजल लवकरच ज्या प्रकल्पांमध्ये काम करत आहे ते पूर्ण करणार आहे. ती नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार होती. पण आता तिच्या जागी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची वर्णी लागणार आहे.
अभिनेत्री करीना कपूर
करीना कपूर दोनवेळा चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान गरोदर राहीली. पण तीने काम करणं सोडलं नाही. 'विरे दी वेडिंग' आणि त्यानंतर 'लाल सिंह चड्डा' चित्रपटा दरम्यान करीना गरोदर होती.
अभिनेत्री ऐश्वर्या राय
ऐश्वर्या 'हिरोईन' चित्रपटा दरम्यान गरोदर राहीली. त्यामुळे तिला अर्ध्यातून शुटिंग थांबवावी लागली. तेव्हा फिल्म मेकर मधुर भंडारकरने ऐश्वर्यावर राग देखील व्यक्त केला.
अभिनेत्री माधुरी दीक्षित
अभिनेत्री माधुरी दीक्षित 'देवदास' चित्रपटा दरम्यान गरोदर होती. तरी देखील नृत्याची राणी माधुरीने देवदास चित्रपटात उत्तम नृत्य सादर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.