3 विवाहित पुरुषांच्या प्रेमात; तरीही झालं नाही लग्न; 49 व्या वर्षी टॉपच्या अभिनेत्याशी लग्न करतीये 'ही' अभिनेत्री

This Actress will Get Married At the Age of 49 : कधी 3 विवाहीत पुरुषांच्या प्रेमात असणारी ही अभिनेत्री वयाच्या 49 व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात... 

दिक्षा पाटील | Updated: Nov 8, 2024, 03:40 PM IST
3 विवाहित पुरुषांच्या प्रेमात; तरीही झालं नाही लग्न; 49 व्या वर्षी टॉपच्या अभिनेत्याशी लग्न करतीये 'ही' अभिनेत्री title=
(Photo Credit : Social Media)

This Actress will Get Married At the Age of 49 : चित्रपटसृष्टीतील कलाकारांची एकमेकांशी नाव जोडण्यात येणं किंवा रिलेशनशिपमध्ये येणं आणि त्यानंतर घटस्फोट घेणं या सगळ्या गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात. इंडस्ट्रीमध्ये आजही असे काही लोक आहेत ज्यांचं लग्न झालेलं नाही. कधीकाळी बॉलिवूडमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या 49 वर्षांच्या या अभिनेत्रीचं 3 विवाहीत पुरुषांवर प्रेम आलं होतं. पण तरी ती लग्न करु शकली नाही, दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की आता ही अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे.  

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून 90 च्या दशकात सगळ्यांचं लक्ष वेधणारी आणि बॉलिवूडमध्ये सलमान ते शाहरुखपर्यंत सगळ्यांसोबत काम करणारी अभिनेत्री नगमा आहे. नगमाला मेगास्टार चिरंजीवी यांच्या चित्रपटात काम केल्यानंतर हॉट ब्यूटी अशी ओळख मिळाली. इतकंच नाही तर तिनं बॉलिवूडमध्ये देखील काम केलं होतं. नगमाचं खरं नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे. नगमाची आई सीमानं पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देत चित्रपट निर्माता चंदर साधनाशी लग्न केलं. नगमाला दोन बहिणी आहेत. ज्योतिका आणि रोहिणी. त्या दोघी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नगमा ने अपने पिता के प्रोत्साहन से फिल्मों में कदम रखा और सलमान खान के साथ 'बागी' फिल्म से अपने करियर की शुरुआत की. इसके बाद उन्होंने तेलुगु फिल्म 'पेड्डिंटी अल्लुडु' में सुमन के साथ काम किया, जो ब्लॉकबस्टर साबित हुई. इसके बाद उन्होंने नागार्जुन के साथ 'किलर' फिल्म में काम किया और लोकप्रियता हासिल की. 

नगमानं चिरंजीवी यांच्यासोबत 'घराना मोगुडु' या चित्रपटात देखील काम केलं आहे. तर हा चित्रपट तिच्या करिअरचा माइलस्टोन ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि टॉलिवूडची टॉपची अभिनेत्री झाली. नगमाचं प्रोफेश्नल करिअर हे यशस्वी ठरलं पण तिच्या खासगी आयुष्यात सतत चढ-उतार येत होते. नगमाचं नाव अनेक अभिनेता आणि क्रिकेटपटूंशी जोडण्यात आलं होतं.

नगमा आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचं अफेअर असल्याचं म्हटलं जात होतं दोघं काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिली. पण गांगुलीच्या पत्नीला याविषयी कळल्यानंतर त्यांचं नातं मोडलं. याशिवाय नगमाचं नाव तमिळ अभिनेता शरत कुमारशी देखील जोडण्यात आलं. पण हे नातं जास्त काळ टिकून राहिलं नाही. त्यानंतर नगमा ही भोजपुरी अभिनेता रवि किशनसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. पण त्यांच्याही वैवाहिक आयुष्यात समस्या आल्यानं यांचं नातं मोडलं.

हेही वाचा : क्राइम पेट्रोल’ आणि 'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्याची आत्महत्या? 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नगमानं यानंतर चित्रपटांपासून स्वत:ला दूर केलं. सध्या ती कॉंग्रेसची महासचिव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नगमा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. असं म्हटलं जातं की ती एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि दोघं लवकरच लग्न करणार आहेत. दरम्यान, नगमानं अजून या बातमीला दुजोरा दिलेला नाही.