मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान सध्या 'बिग बॉस'चे सुत्रसंचालन करताना दिसत आहे. बऱ्याच वेळा बिग बॉसमधील स्पर्धक अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. बिग बॉस 14 मध्ये दिसलेली कश्मीरा शाह तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. कश्मीरा शाह ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते बऱ्याचवेळा तिचा पती कृष्णा अभिषेक तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. कश्मीरा ही बऱ्याचवेळा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कश्मीरा सलमाननं दिलेल्या एका सल्ल्यामुळे गर्भधारणा करू शकली असं तिनं सांगितलं.
हेही वाचा : Samantha-Naga Chaitanya : आजारपणा दरम्यानच समंथाला मिळणार नागा चैतन्यची साथ!
खरंतर कश्मीराचं कृष्णासोबत हे दुसरं लग्न आहे. 2013 मध्ये कश्मीरा आणि कृष्णा हे रिलेशनशिपमध्ये आले होते. या दोघांची भेट ही 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'और पप्पू पास हो गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तर, 2007 मध्येच कश्मीरानं पती ब्रॅड लिस्टरमनला घटस्फोट दिला होता. तर काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कश्मीरा आणि कृष्णा यांनी
कश्मीरानं तिच्या गर्भधारणे विषयी मोठा खुलासा केला होता. कश्मीरा तिच्या गर्भधारणेविषयी सांगताना म्हणाली, नैसर्गिकरित्या ती गर्भधारणा करु शकत नव्हती. त्यामुळे कश्मीरा आणि कृष्णानं IVF Technology चा प्रयत्न केला. परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही. एका मुलाखतीत कश्मीरानं सांगितलं की, तिनं 14 वेळा IVF Technology नं गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, सलमाननं दिलेल्या एका सल्ल्यामुळे कश्मीरा आई झाली. सलमाननं तिला सरोगसीचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. सलमानच्या या सल्ल्यानं कश्मीरा आई झाली. खरंतर कृष्णा आणि कश्मीरानं सरोगसीचा प्रयत्न केला आणि 2017 मध्ये त्यांना जुळी मुलं झाली.