विवाहित पुरुषाशी लग्न, 12 वर्ष नवऱ्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहिली; अभिनेत्री म्हणाली, 'पुरुषाला स्वातंत्र्य द्या...'

Asma Abbas : या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 23, 2024, 04:43 PM IST
विवाहित पुरुषाशी लग्न, 12 वर्ष नवऱ्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहिली; अभिनेत्री म्हणाली, 'पुरुषाला स्वातंत्र्य द्या...' title=
(Photo Credit : Social Media)

Asma Abbas : गेल्या काही काळापासून पाकिस्तानी चित्रपटांविषयी जी क्रेज होती ते पाहून सगळे आश्चर्यचकीत होते. या चित्रपटसृष्टीतील अनेकांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं. अनेकदा ज्या कलाकारांनी चित्रपसृष्टीत किंवा छोट्या पडद्यावर काम केलेलं असतं त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर अनेक गोष्टी कळतात. यावेळी आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. या लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री नाव आसमा अब्बास आहे. आसमा अब्बास गिलनं गुपचूप लग्न केलं होतं. फक्त 2 महिने 10 दिवस त्या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली हे पाहता घरच्यांनी एकमेकांशी बोलणं केलं आणि त्यांचं लग्न झालं. तर याच लग्नाविषयी आसमा अब्बासनं माहिती दिली आहे. 

देसी टीव्हीच्या यूट्यूब चॅनलवर आसमा अब्बासनं तिच्या सीक्रेट मॅरेजशी संबंधीत सगळी माहिती दिली. आसमा अब्बासनं सांगितलं की "गिलनं तिच्या आईशी चर्चा केली. लग्न झालं, त्यानं त्याच्या पहिल्या पत्नीला आमच्या विषयी सांगितलं नाही. त्याचं म्हणणं आहे की तिला त्रास होईल. आमच्या लग्नाविषयी तिला दीड वर्षानंतर कळलं. तोपर्यंत मी छोटी-मोठी काम करायची. तिला जेव्हा कळलं तेव्हा तिला फार त्रास झाला." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आसमा अब्बासनं म्हटलं की "पत्नींनी तिच्या पतीला फ्रीडमदेणं गरजेचं आहे. थोडी मस्त करणं गरजेच आहे. त्यानं काही फरक पडत नाही. आसमा अब्बासनं म्हटलं की तुम्हाला माहित आहे की "एक माणूस तुमच्यासोबत तुमच्या घरात राहत आहे. तो तुमच्या मुलाचा वडील आहे आणि तो काही चुकीचं करणार नाही. जर तो चार महिलांमध्ये थोडा आनंदी राहतो तर त्यात काही वाईट नाही." 

आसमा अब्बासनं केलेलं हे वक्तव्य ऐकताच सुत्रसंचालकानं तिला विचारलं, "तुझ्या संबंधीत जे पुरुष आहेत. उदा. तुमचा मुलगा, जावई. तर  त्यांनाही इतकंच स्वातंत्र्य असेल?" त्यावर उत्तर देत आसमा अब्बासनं सांगितलं की "नाही, माझं थोडं वेगळं आहे... माझ्या पतीचं आधीचं लग्न झालं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीसोबत आम्ही 12 वर्ष एकत्र राहिलो." 

हेही वाचा : Bigg Boss फेम अभिनेत्रीला अटक! मुलीमुळे आली अडचणीत

आसमा अब्बासनं पुढे सांगितलं की "माझ्या नवऱ्याच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. त्यांना कोणतंही मुलं झालेलं नाही. कुटुंबात तो सगळ्यात मोठा होता. कुटुंबातील लोक मुलांविषयी विचारायचे. त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी वारस हवा होता. तर अब्बासला मुलं नको होतं. त्यांचं पहिल्या पत्नीवर खूप प्रेम होतं. त्यांचं म्हणणं होतं की मी 10 जन्म घेतलं तरी तिच्याशीच लग्न करेन. इतकं त्याचं पहिल्या पत्नीवर प्रेम होतं. तर थिएटरमध्ये काम करत असताना त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा मी 23 वर्षांची होती. त्यांच्याशी माझी भेट झाली आणि मी त्यांच्यावर प्रेम करु लागले. ते खूप चांगलं बोलायचे. 4 दिवसातच मी त्यांच्यावर इंप्रेस झाली. आमचं लग्न, ओळख-पाळख, सगळं काही फक्त 2 महिने 10 दिवसात झालं."