अभिनेत्यावर का आली हेल्मेट घालून कंडोम विकत घेण्याची वेळ? 

कंडोम खरेदी करताना भारतीय नागरिकांना लाज वाटते,

Updated: Aug 25, 2021, 08:57 PM IST
अभिनेत्यावर का आली हेल्मेट घालून कंडोम विकत घेण्याची वेळ?  title=

मुंबई : अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल, अभिषेक बॅनर्जी आणि आशिष वर्मा अभिनीत 'हेल्मेट' हा एक बहुप्रतिक्षित थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे जो लोकांना अतिशय मनोरंजक पद्धतीने कंडोम खरेदी करण्यास संकोच दाखवणार आहे. ज्याने या सिनेमाचा ट्रेलर पाहिला आहे त्याला हसू आवरता आलं नाही आणि ट्रेलर पाहिल्यानंतर त्याला वाटू लागलं की, त्याने हा चित्रपट पटकन पाहावा.

ट्रेलर लाँचच्या आश्चर्यकारक यशानंतर, निर्मात्यांनी आता 'बँड बज़ गया' चा व्हिडिओ रिलीज केला आहे. हेल्मेटच्या ऑडिओ अल्बममध्ये 'बँड बज गया' पासून सुरू होणारी 5 गाणी, टोनी कक्कर आणि विभोर पराशर यांनी गायलेले पेप्पी ट्रॅक आणि टोनी कक्कर यांचं संगीत आणि गीत आहेत. या गाण्याचा व्हिडिओ आता रिलीज करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना लवकरच त्याच्या नवीन चित्रपट 'हेलमेट'मधून Zee5वर दमदार एंट्री करणार आहे. हेल्मेट चित्रपटाची कथा कंडोमच्या खरेदीवर आधारित आहे. जी भारतीय समाजातील एक मोठी समस्या आहे. कंडोम खरेदी करताना भारतीय नागरिकांना लाज वाटते, ज्याबद्दल अपरशक्ती खुरानाचा चित्रपट हेल्मेट यावर बोलका होईल

हेलमेट या चित्रपटाच्या स्टारकास्टने अलीकडेच एक विशेष मुलाखत दिली होती. ज्यात अपारशक्ती खुराना यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या काळात कंडोम खरेदी करताना त्यांना खूप अस्वस्थ वाटायचं. चंदीगडमध्ये तो एकदा कंडोम खरेदी करण्यासाठी बाईक हेल्मेट घालून दुकानात पोहोचला होता.

त्याला चंदीगडमधील बहुतेक लोकांनी ओळखलं होतं आणि तो कोणालाही कळू नये की तो कंडोम खरेदी करण्यासाठी आला होता. यामुळे त्याने हा मार्ग स्वीकारला.