मुंबई : सध्या अनेक बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. त्याचबरोबर अनेक चित्रपट बनवण्याची घोषणाही करण्यात येत आहे. दरम्यान, सलमान खान आणि शहनाज गिलचा 'कभी ईद कभी दिवाळी' हा चित्रपट विशेष चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतच त्याचा मेहुणा आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल देखील होते. पण आता बातम्या समोर येत आहेत की, आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. यामागे कोणत्याही प्रोजेक्टबाबत त्यांच्यात मतभेद असल्याचं कारण सांगितलं जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. आयुष शर्माने या चित्रपटाचे अनेक सीन शूट केले होते. मात्र आता त्याने या चित्रपटापासून दुरावल्याचं सांगितलं जात आहे. यामागे एसकेएफचा मुद्दा मोठा असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर या मुद्द्यावरून चर्चा वाढल्यानंतर त्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुष शर्मा आणि सलमान खानमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे. आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माचा नवरा आहे. 'अंतिम द फायनल ट्रुथ' या चित्रपटात दोघं शेवटचे एकत्र दिसले होते. याशिवाय दोघंही मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहेत. त्याचबरोबर, नुकतंच आयुष शर्मानेही एक ईद पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये सलमानची उपस्थितीही पाहायला मिळाली.
सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यात वाद? अभिनेत्याने घेतली सिनेमातून घेतली एक्झिट