माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट 'एक डाव भुताचा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

पुन्हा एकदा अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Sep 13, 2024, 03:38 PM IST
माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट 'एक डाव भुताचा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित title=

Ek Daav Bhutacha : पुन्हा एकदा अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांची जोडी 'एक डाव भुताचा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट 'एक डाव भुताचा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा नुकताच टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. 

'एक डाव भुताचा' टीझर रिलीज

'एक डाव भुताचा' हा चित्रपट 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा हॉरर चित्रपट असून या चित्रपटात भरपूर कॉमेडी आहे. पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांची जोडी बघायला मिळणार आहे. या चित्रपटात स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं साकारली आहे. तर मकरंद अनासपूरे हे या भुताच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडी आहे.  माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आहे

संदीप नवरे यांनी केले चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन 

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. त्यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.