चित्रपटांमध्ये कलाकारांनी परिधान केलेले स्टाईलिश कपडे तुम्हाला हवे आहेत?

सिनेमांत स्टार्स जे कपडे परिधान करतात त्या कपड्यांचं नंतर काय होतं?

Updated: Apr 23, 2021, 06:03 PM IST
चित्रपटांमध्ये कलाकारांनी परिधान केलेले स्टाईलिश कपडे तुम्हाला हवे आहेत? title=

मुंबई : करीना कपूर, दीपिका पादुकोण, सोनम कपूर आणि आलिया भट्ट या अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांना कमाल ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखलं जातं. त्याचबरोबर करीनाबद्दलही असं म्हटलं जातं की, तिला सिनेमांतील प्रत्येत सीन्समध्ये नेहमी स्टाईलिश दिसण्याची इच्छा असते. उदाहरणार्थ, करीना कपूरने 'हिरोईन' सिनेमांत 130 ड्रेस परिधान करून एक अनोखा विक्रम केला. त्याचवेळी माधुरी दीक्षितने 'देवदास'मध्ये 30 किलोचा लेहंगा घातला होता. त्याचवेळी 'रामलीला' मध्ये दीपिकाचा लेहेंगा देखील 30 किलोचा होता. बॉलिवूड चित्रपटात स्टार जे कपडे परिधान करतात ती फॅशन बनते. बनतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? सिनेमांत स्टार्स जे कपडे परिधान करतात त्या कपड्यांचं नंतर काय होतं? आम्ही तुम्हाला सांगतो

कपड्यांचा होतो लिलाव
बर्‍याच वेळा चित्रपटांमध्ये स्टार्सने परिधान केलेल्या कपड्यांचा लिलाव होतो, ज्यामुळे पैसे मिळतात आणि हे पैसे दान केले जातात. 'देवदास' चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितने घातलेला ग्रीन लेहेंगा 3 कोटीला विकला गेला.

चित्रपटातील स्टार्सच्या चाहत्यांची काही कमतरता नाही, ते त्यांच्या आवडत्या हिरो-हिरोईनसाठी लाखो रुपये खर्च करायला देखील तयार असतात. सलमानच्या एका चाहत्याने 'मुझसे शादी करोगी' चित्रपटात सलमानने वापरलेला टॉवेल दीड लाखाला खरेदी केला होता

आठवण म्हणून स्टार्स आपल्याकडे ठेवातात कपडे
बर्‍याच वेळा सिनेमातील कलाकारांना ते कपडे इतके आवडतात की ते त्यांना आपल्याकडेच ठेवतात. आणि चित्रपट निर्माते देखील ते कपडे त्यांना आनंदाने देतात, मात्र हे कपडे स्टार्स घालत नाहीत तर चित्रपटाची आठवण म्हणून ठेवतात.

प्रोडक्शन हाऊसच्या खोलीत ठेवले जातात कपडे
कधीकधी लिलाव झाला नाही तर, या महागड्या कपड्यांना प्रोडक्शन हाऊसच्या खोलीत एका बॉक्समध्ये ठेवून त्या चित्रपटांची नावे लिहिली जातात. एका अहवालानुसार हा दावा यशराज फिल्म्सच्या स्टाईलिश आयशा खन्नाने केला आहे.