अनेक कारणांच्या गर्दीत अखेर सैफ- अमृताच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर 

सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या मुलांसोबत सुखी कुटुंबाप्रमाणे जीवन जगत आहेत

Updated: Mar 29, 2022, 01:16 PM IST
अनेक कारणांच्या गर्दीत अखेर सैफ- अमृताच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर  title=

मुंबई : सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर आपल्या मुलांसोबत जरी सुखी कुटुंबाप्रमाणे जीवन जगत असले तरी, वेळोवेळी सैफच्या पास्ट दिवसांचे किस्से समोर येत असतात. सैफनं दोन लग्न केली आहेत. हे प्रत्येकाला माहित आहे. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झालं होतं. मात्र, अमृतापासून घटस्फोटाचं खरं कारण काय, हा प्रश्न आजही कायम त्यांच्या चाहत्यांना आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंगला वेगळं होऊन बरीच वर्षे झाली आहेत. पण जेव्हा-जेव्हा बॉलिवूड लव्हस्टोरीचा उल्लेख समोर येतो तेव्हा या कपलचीही चर्चा होते.

खरंतर, सैफ अली खान आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीलाच त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांनी 1991 मध्ये गुपचूप लग्न केलं. आतापर्यंत इटालियन मॉडेल रोजा आणि नंतर अभिनेत्री करीना कपूरमुळे सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात प्रकरण काही वेगळच होतं.

एका मुलाखतीत सैफ म्हणाला होता की, 'अमृतापासून वेगळं होण्यामागे तिची वाईट वागणूक होती. अमृता तिच्या कुटुंबासोबतही नीट राहिली नाही. यामुळे आमचे खटके उडू लागले होते आणि शेवटी आम्ही दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या वेळी, सारा 10 वर्षांची होती तर तिचा भाऊ इब्राहिम फक्त 4 वर्षांचा होता. लग्नाच्यावेळी सैफ चित्रपटात वावरण्यात मग्न होता. लग्नानंतर अमृताने चित्रपटातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच सैफचे जे काही चित्रपट येत होते ते सतत फ्लॉप होत होते.

सैफच्या म्हणण्यानुसार, अमृता नेहमी त्याला अयशस्वी नवरा म्हणून टोमणे मारायची. त्याने एका मुलाखतीत याचा खुलासाही केला होता. इतकंच नाही तर सैफच्या म्हणण्यानुसार अमृताने त्याला त्याची मुलं सारा आणि इब्राहिम यांना भेटूही दिलं नाही. आता या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे याची पुष्टी त्यांनाच ठावूक, मात्र समोर आलेल्या बातम्यांनुसार, वर्षानुवर्षे या दोघांचे वाद आणि भांडण सतत होत होती. मात्र जेव्हा दोघांमधले वाद संपता संपत नव्हते तेव्हा या दोघांनीही वेगळा होण्याचा निर्णय घेतला.