मुंबई : भाईजान सध्या त्याचे वडील सलीम खान यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. सलमान खान बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे तो जवळजवळ 56 वर्षांचा आहे मात्र असं असलं तरीही तो सिंगल आहे. सलमान लग्न का करत नाही याचा खुलासा खुद्द सलीम खान यांनी केला आहे.
सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण ज्याच्या-ज्याच्याशी सलमानचं नाव जोडलं गेलं त्या सर्व अभिनेत्रींने लग्न केलं, मात्र आजपर्यंत भाईजान सलमान अविवाहित आहे. मात्र सलमान खान लग्न का करत नाही आणि तो कधी लग्न करणार, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
या लग्नाबाबत सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दिलेल्या वक्तव्यात त्यांना यासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. लग्न न होण्यास सलमान स्वतः जबाबदार असल्याचं सलीम खान यांनी सांगितलं. त्याची इच्छा असेल तर तो आजही लग्न करू शकतो, पण वयाच्या 56 व्या वर्षीही सलमान लग्न करत नाहीये आणि सलमान क्वचितच लग्न करेल अशी शक्यता आहे. कारण सलीम खान यांनी आपल्या वक्तव्यात हेच म्हटलं आहे की, स्वत: सलमानला बॅचलर म्हणून जबाबदार धरण्यात आलं आहे.
सलमान त्याच्या वडिलांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सलीम खान यांनी पुढे सांगितलं की, सलमान खान अजून प्रेमात पडलेला नाही, त्यामुळे सलमान अजून लग्न करू शकला नाही आणि त्यामुळेच त्याचं लग्न होत नाहीये.
लग्न न होण्यास सलमान स्वतः जबाबदार असल्याचं सलीम खान यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.सलमान प्रेमात पडला तर तो लवकरच लग्न करू शकतो. सलमान खानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक अभिनेत्रींसोबत त्याने कामही केलं आहे, मात्र ज्यांना ज्यांना अभिनेत्याने डेट केलं आहे त्या सगळ्याच लग्नबंधनात अडकल्या आहेत.
सलमान खानने अद्याप लग्न केलेलं नाही. पण आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे की, सलमान लग्न करतो की नाही आयुष्यभर तो बॅचलर राहणार आहे. मात्र अलीकडे सोनम कपूरसोबत सलमान खानचेही नाव जोडले जात आहे.