पत्नीची मौल्यवान वस्तू गहाण ठेवून भाऊ कदम यांना करावा लागला होता प्रवास

'पांडू' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Updated: Dec 18, 2021, 08:32 PM IST
पत्नीची मौल्यवान वस्तू गहाण ठेवून भाऊ कदम यांना करावा लागला होता प्रवास title=

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये झळकणा-या साध्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोटधरुन हसायला भाग पाडलं आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने. 

याचबरोबर सध्या भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'पांडू' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अनेक ठिकाणी या सिनेमाचे हाऊस फुल्लचे बोर्ड पहायला मिळाले. या सिनेमाचं प्रमोशनदेखील दणक्यात सुरु आहे. नुकतीच झी मराठी वाहिनीवरील 'होम मिनीस्टर' या कार्यक्रमात भाऊ कदमसह त्याच्या कुटूंबाने हजेरी लावली.

जरी आज भाऊ यांनी यशाचा शिखरं गाठला असला तरी हे शिखर गाठण्यासाठी भाऊ यांना खूप वाईट दिवसांचाही सामना करावा लागला. असाच एक किस्सा भाऊ यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितला. यावेळची भाऊ यांनी सांगितलेला किस्सा ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणवले. होम मिनीस्टर मध्ये भाऊ कदम म्हणाले की, ''दुबईला शूटिंगला जायचं होतं. पण पैसेच नव्हते सगळा खर्च मांजरेकर करणार होते. त्यामुळे पैशांची तशी काय गरज नव्हती. पण खिशात पैसेच नव्हते. पण खिशात काहीतरी पैसे असावे म्हणून मित्रांकडे मागितले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक- दोन हजार असतील तर द्या मी परत करीन.  पण त्यांना शाश्वती ही नव्हती की, मी त्यांना पैसे परत करेन. कारण जॉब काहिच नव्हता तसं, मी परत करणारच होतो परत. पण शेवटी घरच्यांनी हातात पैसे दिले आणि म्हणाले हे घे ठेव. मी विचारलं तुमच्याकडून कुठून आले तर त्यांनी आंगठी विकली होती. आणि म्हणाले यातून परत काही आणू नका.तुम्ही वापरा. पण माझी डेरींगच होणार नाही काही घ्यायची. त्यावेळी फार संभाळलं मला''. हा किस्सा सांगताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.