अपूर्वा नेमळेकर भावाच्या आठवणीच भावूक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

कायमच अपूर्वा तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र नुकतीच अभिनेत्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Apr 15, 2024, 11:01 PM IST
अपूर्वा नेमळेकर भावाच्या आठवणीच भावूक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अपूर्वाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीने एखादी पोस्ट शेअर करताच चर्चेत येते.  कायमच अपूर्वा तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र नुकतीच अभिनेत्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. गेल्यावर्षी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिचा भाऊ ओमकार नेमळेकरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने अभिनेत्री पूर्णपणे खचली होती. भावाच्या आठवणीत अपूर्वाने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट
अभिनेत्रीने १४ एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली. या फोटोमध्ये तिच्यासह तिचा भाऊ ओमकार आणि आईही दिसते आहे. हा फोटो शेअर करताना तिने असे कॅप्शन दिले की, 'भाई, तू मला नेहमी खंबीर राहायला शिकवलं आहेस, पण मला माफ कर मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आहे. मी तितकी खंबीर कधीच होऊ शकणार नाही की, मी मान्य करेन की आता तू या जगात नाहीस.' अपूर्वाने पुढे लिहिले की, 'तुझ्याशिवाय एक वर्ष निघून गेले, पण असा एकही दिवस गेला नाही आहे की मी तुझा विचार केला नाही. मला तुझी आठवण येते आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे.' 

पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीच्या दु:खात सहभागी झाले आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय की, आई सारखे दुसरे दैवत नाही. तर अजून एकाने लिहीलंय, ओमकार दादा we always miss and love you तर अजून एकाने लिहीलंय, Apu @apurvanemlekarofficial ओमीबद्दल हे ऐकून खरच धक्का बसला त्याच्या आत्म्याला शांती लाभो. plz काकीची काळजी घे. तर अजून एकाने लिहीलंय, दुःखाची गोष्ट म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो तिथे नाही पण त्याचं अस्तित्व सर्वत्र आहे आणि त्याच्या आशीर्वादांना तुमच्या आयुष्यात कोणतीही सीमा राहणार नाही. तो जिथे असेल तिथे देव त्याला आशीर्वाद देवो. तर अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या अपूर्वाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या अपुर्वा 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत दिसत आहे. सावनी हे पात्र प्रेक्षक डोक्यावर उचलून घेताना दिसत आहे. तर 'रात्रीस खेळ चाले'मधील तिची शेवंताची भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. अपूर्वाने बिग बॉस मराठीचे पर्वही गाजवलं होतं.