'कोका कोला' गाण्यावर थिरकताना 'या' मुलींचा व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर 'कोका कोला' गाण्यावर थिरकणाऱ्या मुलींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Updated: Feb 11, 2019, 01:27 PM IST
'कोका कोला' गाण्यावर थिरकताना 'या' मुलींचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृति सेनन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'लुका छुपी'  सिनेमातील दुसरे गाणे काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आले. 'कोका कोला' असे प्रदर्शित झालेल्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याल्या तरुनांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. इंटरनेटवर 'कोका कोला' गाण्यावर थिरकणाऱ्या मुलींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मोहीत जैन नृत्य विद्यालयाच्या या विद्यार्थीनी असून विद्यालयाने यू ट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या तब्बल 1 लाखांपेक्षाही 
वर गेली आहे.

 

अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले 'कोका कोला' गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे. मूळ 'कोका कोला' या गाण्याला गायक टोनी कक्करच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला चार लाखांपेक्षाही जास्त वेळा पाहिले आहे. 

बोल्ड विनोदी असलेल्या 'लुका छिपी' सिनेमाची गोष्ट ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आली. सिनेमात कार्तिक-कृति लिव-इन मध्ये राहत असतात. नंतर त्यांच्या घरातल्यांचा त्यांनी पळुन लग्न केले असल्याचा गैरसमज होतो. त्यानंतर हे दोघे कुटुंबात एका जोडप्याप्रमाणे राहतात. सिनेमाची निर्मिती दिनेश विज़ान यांनी केली आहे. १ मार्च रोजी 'लुका छिपी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.