एक कोटी रुपये घेणारा पहिला भारतीय स्टार; कारकिर्दीच्या शिखरावर राजकारणासाठी सोडली इंडस्ट्री

फिल्म मेकिंगचं इकोनॉमिक्स नेहमीच हिरोच्या अवतीभोवती फिरतं. मग तो मोठा सिनेमा असो की, मग एक्शन असो की मग, रोमान्स. नेहमीच आघाडीच्या हिर- हिरोईन्सच्या नावाचा वापर करुन सिनेमा विकला जातो.  आज भारताचा सगळ्यात मोठा सुपरस्टार एका सिनेमासाठी १०० करोड रुपयांपेक्षा जास्त चार्ज करतो.

Updated: Dec 29, 2023, 03:47 PM IST
एक कोटी रुपये घेणारा पहिला भारतीय स्टार; कारकिर्दीच्या शिखरावर राजकारणासाठी सोडली इंडस्ट्री title=

मुंबई : फिल्म मेकिंगचं इकोनॉमिक्स नेहमीच हिरोच्या अवतीभोवती फिरतं. मग तो मोठा सिनेमा असो की, मग एक्शन असो की मग, रोमान्स. नेहमीच आघाडीच्या हिर- हिरोईन्सच्या नावाचा वापर करुन सिनेमा विकला जातो.  आज भारताचा सगळ्यात मोठा सुपरस्टार एका सिनेमासाठी १०० करोड रुपयांपेक्षा जास्त चार्ज करतो. मात्र एक वेळ अशीही होती  जेव्हा एका सिनेमासाठी एक करोड रुपये लांबच्या स्वप्नासारखं वाटयचं. मात्र मग एक असा स्टार आला ज्याने हे सगळं मोडून काढलं आणि स्वत: सिनेसृष्टीतल्या यशाचं अस्तित्व सिद्ध केलं.
 
हा होता पहिला स्टार ज्याने त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी  1 करोड रुपये इतकी फी चार्ज केली
वर्ष होतं 1992...अमिताभ बच्चन बॉलीवूडचे शहंशाह होते. तर साऊथमध्ये रजनिकांत स्वत:ला सुपरस्टार म्हणून सादर करत होते. तरी सुद्धा या दोघांपैकी कधीच तेव्हा कोणी १ करोड रुपये कमवले नव्हते. मात्र टॉलिवूडमध्ये एक स्टार असा होता ज्याने कमाईच्या बाबतीत सगळे विक्रम मोडले. हा स्टार होता मेगास्टार  चिरंजीवी. मेगास्टार चिरंजीवी ने Aapadbandhavudu साठी 1.25 करोड रुपये चार्ज केले होते. यामध्ये तो भारतातील सगळ्यात जास्त कमाई करणारा अभिनेता बनला. रिपोर्टनुसार त्यावेळी अमिताभ बच्चन एका सिनेमासाठी जवळ-जवळ 90 लाख रुपये चार्ज करायचे.

या सक्सेसनंतर चिरंजीवीला मार्केटच्या पॉवरच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा स्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर  द वीक मॅगझिनने एक कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती.  तेलुगू चित्रपट उद्योगात प्रमुख नायक म्हणून स्थापित केले.  2008 मध्ये, चिरंजीवीने त्याच्या चाहत्यांना तेव्हा आश्चर्यचकित केलं जेव्हा त्याने जाहीर केलं की, तो राजकारणावर फोकस करण्यासाठी चित्रपटसृष्टी सोडत आहे. या निर्णयानंतर हा मेगास्टार जवळपास दशकभर चित्रपटांपासून दूर राहिला. तो 2017 च्या हिट कैदी नंतर 2017 सह परतला आणि त्यानंतर त्याने इतर अनेक एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले.

भारतीय सिनेमाचा 1 करोड रुपयांचा क्लब कसा वाढला?
कमल हासन १ करोड रुपये चार्ज करणारा पुढचा स्टार होता. जे त्यांनी  1994 मध्ये केलं. यानंतर त्यांचे कॉम्पिटीटर आणि मित्र रजनीकांतदेखील लवकरच या मैदानात उतरले. 1996 मध्ये जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या वेकेशनवरुन परतले तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रत्येक सिनेमासाठी  1 करोड़ रुपये चार्ज करायला सुरुवात केली.