अरबाज खाननंतर मलायकाही करणार दुसरं लग्न? फराहच्या प्रश्नावर लाजत दिलं उत्तर, म्हणाली 'दुसरा मुलगा...'

अरबाज खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यानंतर त्याच्यासह पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरादेखील चर्चेत आली आहे. मलायकादेखील अर्जून कपूरसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 29, 2023, 03:04 PM IST
अरबाज खाननंतर मलायकाही करणार दुसरं लग्न? फराहच्या प्रश्नावर लाजत दिलं उत्तर, म्हणाली 'दुसरा मुलगा...' title=

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यानंतर मलायका अरोराही चर्चेत आली आहे. मलायका अरोरादेखील लवकरच लग्न करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलायकाने स्वत: तसे संकेत दिले आहेत. रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 11' मध्ये पोहोचलेल्या फराह खानने मलायकाची मुलाखत घेताना अनेक प्रश्न विचारले. यावेळी तिने मलायकाला दुसऱ्या लग्नाचाही विचारणा केली. 

फराह खानने यावेळी मजा मस्ती करत मलायका अरोराची मुलाखत घेतली. यावेळी तिने मलायकाला लग्नाबद्दलही विचारलं. तिने मलायकाला विचारलं की, "मलायका, 2024 मध्ये तू सिंगर पॅरेंटवरुन डबल पॅरेंट कम अभिनेत्री होणार आहेस का?". हे ऐकल्यावर मलायका म्हणते की, "म्हणजे मला कोणाला तरी दत्तक घ्यावं लागणार आहे का? या प्रश्नाचा अर्थ काय आहे?". त्यावर 'झलक दिखला जा 11' ची होस्ट गौहर खान समजावून सांगते की, 'याचा अर्थ तुझं लग्न होणार आहे का?'.

'100 टक्के मी लग्न कऱणार आहे'

यावर मलायका लाजत उत्तर देते की, "जर कोणी असेल तर मी 100 टक्के लग्न करेन". त्यावर फराह खान म्हणते, कोणी कशाला भरपूर आहेत. त्यावर मलायका म्हणते 'कोणी विचारलं तर नक्की लग्न करेन'. यावर फराह पुन्हा विचारते की, 'कोणीही विचारलं तरी तू लग्न करणार का?'. त्यावर मलायका उत्तर देते की, "हो, करेन". मलायकाने यावेळी थेट सांगितलं नाही, पण संकेत देत आपण 2024 मध्ये लग्न करु शकतो असं म्हटलं आहे. आता यावर अर्जून कपूर काही बोलणार का हे पाहावं लागणार आहे. 

मलायका अरोरा गेल्या काही वर्षांपासून अर्जून कपूरला डेट करत आहे. दोघांनीही आपलं नातं जाहीर केलं असून, सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. दोघं अनेक ठिकाणी एकत्र फिरताना तसंच सुट्ट्या घालवताना दिसत असतात. 

अरबाज खान 24 डिसेंबरला मेकअप आर्टिस्ट शूरा खानसह विवाहबंधनात अडकला आहे. या निकाहसाठी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला. अरबाज खानचं हे दुसरं लग्न आहे. मलायकला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 56 व्या वर्षी तो पुन्हा एकदा नवरदेव झाला आहे. 

अरबाज खान आणि शूराची पहिली भेट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. बराच काळ ते एकमेकांना डेट करत होते आणि अखेर विवाहबंधनात अडकले. 

6 वर्षांपूर्वी घटस्फोट
 

शूराच्या आधी अरबाजचं लग्न मलायकाशी झालं होतं. जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी 2017 मध्ये एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांना अरहान नावाचा एक मुलगा आहे. अरबाज खानच्या लग्नात अरहानही उपस्थित होता. यावेळी त्याने विशेष परफॉर्मन्स दिला होता.