अभिनेत्री अभिनयसोडून गावात करतेय असं काम? अवस्था पाहून चाहते हैराण

  अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Updated: Jul 8, 2022, 01:12 PM IST
अभिनेत्री अभिनयसोडून गावात करतेय असं काम? अवस्था पाहून चाहते हैराण title=

मुंबई : एकेकाळी टीव्हीच्या दुनियेत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या रतन राजपूतचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री गावात शेतात काम करताना दिसत आहे. रतनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला असेल की, अभिनय सोडून ही अभिनेत्री गावागावात का भटकत आहे.

रतन राजपूतचा व्हिडिओ
रतन राजपूत ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रतन नेहमीच ग्लॅमरच्या जगापासून दूर असते. तिला साधं राहणीमान आवडतं. आपण तिला बहुतेकदा मेकअपशिवाय पाहिलं आहे. रतनलाही तिचं गाव खूप आवडतं आणि तिला हवं तेव्हा ती तिच्या गावी जाते. अभिनेत्रीच्या गावाची झलक तिच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. आता रतनच्या नवीन व्लॉगमध्ये ती बिहारमधील एका गावाच्या दौऱ्यावर गेली आहे.

रतनने केली शेती
रतन राजपूतच्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती बिहारमधील आवाडी गावात गेली आहे. गावाच्या वाटेवर सती मातेचे मंदिअसून तेथे रतनने भेट दिली आहे. रतनने सांगितलं की, ती महाराष्ट्रातील एका गावात राहते. तिने गावात कांदे आणि हळद पिकाची लागवड केली आहे. यासोबतच रतनने असंही सांगितलं की, तिला गावातील जीवन जगण्यात मजा येते. गावातील जीवन जगण्यासाठी रतनने शेती केली आहे.

करिअरबद्दल बोलायचं झालं तर रतन शेवट 'संतोषी माँ सुनिये व्रत कथाएं' या मालिकेत दिसली होती. हा शो 2020 मध्ये प्रसारित झाला. आता हा शो बंद झाला आहे. या शोनंतर रतन पडद्यावर दिसली नाही. त्यामुळे रतन इंडस्ट्री सोडणार असल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, ती आता यूट्यूबर बनली आहे आणि यूट्यूब व्हिडीओजच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.