मुंबई : मैत्री, प्रेम एक अशी भावना जी फक्त अनुभवली जाते. मैत्रीच्या या प्रवासात अनेक असे अनुभव येतात जेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रीण समाजाला मान्य नसेल असे काम करते. असाचं एक अनुभव आला आहे, अभिनेत्री माहिका शर्माला. २ जुन हा दिवस इंटरनॅशनल सेक्स वर्कर्स डे म्हणून साजरा केला जातो. सेक्स वर्कर्स डेच्या दिवशी महिकाने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. माहिकाने डॅनी डीसोबत मैत्री केल्यामुळे तिला सेक्स वर्कर समजलं जात होत. त्यानंतर माहिकाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
माहिका म्हणाली, 'जेव्हा माझ्या आणि डॅनीच्या मैत्रीबद्दल सर्वांना कळालं, तेव्हा अनेक संकटांचा सामना करावा लागला. तो काळ माझ्या आयुष्यातील फार कठीण काळ होता. मी डॅनीची मैत्रीण असल्यामुळे लोक मला देखील सेक्स वर्कर समजायला लागले होते. त्यावेळी मला अनुभव झाला सेक्स वर्कर महिलांना त्यांच्या जीवनात अत्यंत संकटांचा, संघर्षांचा सामना करावा लागतो. '
पुढे माहिका म्हणाली, 'कोणीचं त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही. त्यांना हिंसेचा सामना करावा लागतो. त्याचं दिवशी मी ठरवलं आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करु लागले. मला असं वाटतं प्रॉस्टीट्यूट कायमचा संपला पाहिजे. त्या सर्व महिलांना या विश्वातून बाहेर काढलं पाहिजे...' माहिकाने अनेका मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रामायण', 'तू मेरे अगल बगल', 'FRI' या मालिकांमध्ये काम केलं आहे.