Oscars2020 : ऑस्करच्या मानचिन्हाची किंमत अवघी ७० रुपये; पाहा कसं आहे हे गणित?

कोणीही व्यक्ती ऑस्करच्या मानचिन्हाचा.... 

Updated: Feb 9, 2020, 05:18 PM IST
Oscars2020 : ऑस्करच्या मानचिन्हाची किंमत अवघी ७० रुपये; पाहा कसं आहे हे गणित?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : संपूर्ण कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे ती म्हणजे द अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांची. फक्त हॉलिवूडमध्येच नाही, तर भारतातही या पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटप्रेमींसाठी हा सोहळा म्हणजे एक परवणीच. अशा या दिमाखदार सोहळ्यामध्ये आता ऑस्करच्या मानचिन्हाचं अनन्यसाधारण महत्त्वं. 

आपल्या कारकिर्दीमध्ये एकदा तरी ऑस्कर पुरस्कार हाती घ्यावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा. याच मानचिन्हाविषयीची एक रंजक गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? मुळात हे मानचिन्हं परत करण्यास गेलं असता त्याची किती किंमत मिळते या प्रश्नाचं उत्तरही तितकंच धक्कादायक आहे. 

१३.५ इंच इतक्या उंचीचं आणि ३.८ किलोग्रॅम तांब्यापासून बनवण्यात आलेल्या या मानचिन्हावर २४ कॅरेट सोन्याचा एक थर चढवला जातो. द अकॅडमीच्या नियमांमुसार कोणीही व्यक्ती ऑस्करच्या मानचिन्हाचा लिलाव करु इच्छित असेल तर त्यापूर्वी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एँड सायन्सला ते द्यावं लागतं. 

नियमांनुसार विजेत्या व्यक्तीच्या त्या मानचिन्हावर पूर्णत: मालकी हक्क नसतो. विजेता इच्छा असतानाही त्या मानचिन्हाची विक्री करु शकत नाही. मानचिन्हाची विक्री करायची झाल्यास तो अकॅडमीलाच परत द्यावा लागतो. ज्यानंतर अकॅडमी अवघ्या एक डॉलरच्याच किंमतीला ते विकत घेते. म्हणजे पुरस्कारस्वरुपी मानचिन्हाची विक्री करणाऱ्या व्यक्तीला भारतीय चलनामुसार जवळपास ७० ते ७८ रुपयेच मिळू शकतात. 

Oscars2020 : ऑस्करसाठी अंथरलेल्या रेड कार्पेटची किंमत ऐकून धक्काच बसेल

जिथे ऑस्करचं एक मानचिन्हं तयार करण्यासाठी जवळपास ४०० डॉलर इतका खर्च येतो. तर, हे मानचिन्हं मिळवण्यासाठी कोट्यवधींची उलाढाल करत चित्रपट साकारण्यात येतात. तिथेच या मानचिन्हाची विक्री केल्यास प्रथमत: त्याची किंमत अवघी १ डॉलर इतकीच असते. कारण, मामला ऑस्करका है.....