GOAT Teaser : थलपती विजयच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं सरप्राइज, डबल रोलमध्ये करणार धमाका...

Thalapathy Vijay :  थलपती विजयनं वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिलं खास सरप्राइज...

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2024, 05:06 PM IST
GOAT Teaser : थलपती विजयच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं सरप्राइज, डबल रोलमध्ये करणार धमाका... title=
(Photo Credit : Social Media)

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेता विजय सगळ्यात शेवटी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या लियो या चित्रपटानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तेव्हापासून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. आज विजयचा 50 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं टीझर प्रदर्शित केला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाची पहिली झलक आता समोर आली आहे. 

'द गोट' (The Greatest of All Time The GOAT) वाढदिवसाच्या शॉट्स नावाच्या 50 सेकेंडच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. टीझर समोर येताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. थलपती विजयच्या द गोट ची बऱ्याच वेळापासून प्रतिक्षा करत होते. लियोनंतर तो याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. त्यामुळे निर्मात्यांनी विजय थलपतीच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्तानं सरप्राइज दिलं आहे. या 50 सेकंदाच्या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यात अॅक्शन आणि स्टंट दिसत आहेत. त्यासोबत विजय थलपतीचा डबल रोल देखील पाहायला मिळाला आहे. व्हिडीओत त्याची झलक पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' एक सायन्स-फिक्शन चित्रपट आहे. चित्रपटात डबल रोल साकारला आहे. विजय थलपती यात वडील आणि मुलाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाला टेन्टेटिव्ह टायटल हे थलपती 68 असण्याची शक्यता आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकट यांनी केले आहे. चित्रपटात विजयशिवाय प्रशांत, प्रभू देवा, मीनाक्षी चौधरी, अजमल अमीर, स्नेहा सारखे कलाकार पाहायला मिळाले आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता त्याच्या सगळ्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे 5 सप्टेंबरची. विजय थलपतीच्या चाहत्यांची लिस्ट हे देखील खूप मोठी आहे. 

हेही वाचा : रस्त्यावर वडापाव विकून दिवसाला तब्बल इतके कमावते चंद्रिका दीक्षित; तुमचा महिन्याचा पगारही इतका नसेल

दाक्षिणात्य चित्रपटानुसार विजयनं एका पेक्षा एक असे हिट चित्रपट दिले. 22 जून 1974 रोजी विजयचा जन्म झाला. त्याचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. विजयनं एक बाल कलाकार म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही.