'तेरे नालही नचणा वे...' म्हणत Amruta Fadanvis यांनी रिल स्टारबरोबर धरला ठेका, Video व्हायरल

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, त्यानंतर त्यांना चाहत्यांना एक चॅलेंजही दिलं होतं, आता पुन्हा त्यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Updated: Jan 18, 2023, 04:36 PM IST
'तेरे नालही नचणा वे...' म्हणत Amruta Fadanvis यांनी रिल स्टारबरोबर धरला ठेका, Video व्हायरल title=

Amruta Fadanvis Song : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrta Fadanvis) या सोशल मीडियावर (Social Media) चांगल्यात सक्रिय असतात. विविध विषयांवर सोशल मीडियात त्या आपलं मत व्यक्त करत असतात. पण त्याच बरोबर त्या एक उत्तम गायिका देखील आहेत. अमृता फडणवीस यांचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं (Amruta Fadanvis New Song Release). हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला लाखोंनी व्ह्यूज मिळाले आहे. त्याचबरोबर गाण्यातील अमृता फडणवीस ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे.

अमृत फडणवीस यांनी दिलं होतं चॅलेंज
गाणं प्रदर्शित झाल्याने एक व्हिडिओ पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी चाहत्यांना एक चॅलेंज दिलं होतं. आपल्या 'आज मै मूड बना लेया', या गाण्यावर हुकअप स्टेप करत त्याचे रिल बनवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. तसंच या गाण्याचे हॅशटॅगही वापरण्यास त्यांनी सांगितलं होतं. 

रिल स्टारबरोबर धरला ठेका
आता अमृता फडणवीस यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या 'आज मै मूज बना लेया' या गाण्यावर त्यांनी रिल स्टारबरोबर ठेका धरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. रियाझ अली (Riyaj aly) असं या रिल स्टारचं नाव आहे. अमृता फडणवीस यांच्याबरोबरच्या डान्सचा व्हिडिओ रियाझ अलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रियाझ अलीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. 

कोण आहे रियाझ अली?
Riyaj aly हा एक भारतीय रिल स्टार आहे. अवघ्या 18 व्या वर्षात त्याने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिजाझ अलीचा जन्म भूतानमध्ये झाला. पण तो पश्चिम बंगालमध्ये आला. आज त्याचे करोडो भारतीय चाहते आहेत. रियाझ अलीचे इन्स्ट्राग्रावर जवळपास 24 मिलिअन फॉलोअर्स आहेत. रिल स्टारबरोबरच तो मॉडल आणि फॅशन ब्लॉगरही आहे. त्याचं नेटवर्थ जवळपास 80 लाख इतकं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)

आज मै... गाण्याला लाखो व्ह्यूज
अमृता फडणवीस यांचं नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं बॅचलर पार्टीतील कथानकावर आधारित असून 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' असे या गाण्याचे बोल आहेत. आपल्या नव्या गाण्यात अमृता फडणवीस या वेगवेगळ्या लूकमध्ये पाहिला मिळत असून त्यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अमृत फडणवीस यांनी गाणं गायलं होतं.