हे खरंय! 'या' गावात समंथा लोकांसाठी 'प्रभू'; आता मंदिरातच होणार तिची पूजा

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पुष्पा' या सिनेमात 'उ अंतावा' हे आयटम साँन्ग करुन तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावरही अभिनेत्री सक्रिय असते.

Updated: Apr 27, 2023, 02:52 PM IST
हे खरंय! 'या' गावात समंथा लोकांसाठी 'प्रभू'; आता मंदिरातच होणार तिची पूजा title=

मुंबई : अभिनेत्री सामंथा  रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सामंथाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आत्तापर्यंत अभिनेत्रीने बऱ्याच सिनेमात काम केलं आहे. अनेक आयटम साँन्गही तिने इंडस्ट्रीला दिली आहेत.  'पुष्पा' या सिनेमात 'उ अंतावा' हे आयटम साँन्ग करुन तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावरही अभिनेत्री सक्रिय असते. स्वत:चे सगळे अपडेट अभिनेत्री नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नेहमी ती सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्रीची लोकप्रियता केवळ साऊथमध्येच नाही तर संपूर्ण देशात आहे. 

पण तुम्हाला माहितीये का? की, सामंथाची साऊथमध्ये इतकी लोकप्रियता आहे की, तिचं तिच्या चाहत्यांनी मंदिर बांधलं आहे. साऊथमधील लोकं तिला देव मानतात. याआधीही तामिळनाडूमध्ये त्यांच्या चाहत्यांनी अभिनेत्री नयनतारा, हंसिका आणि नमिता यांच्या नावाने मंदिरे बांधली आहेत. मात्र सामंथाच्या नावाचं मंदिर बांधलेलं पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

ज्या चाहत्याने सामंथाच्या नावाचं मंदिर बांधलं आहे. त्या व्यक्तीचं नाव तेनाली संदीप (Tenali Sandeep) आहे असं म्हटलं जात आहे. सामंथाच्या नावे असलेलं हे मंदिर आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) मधील बापटलाच्या जवळ अलापडू गावात आहे. मंदिराचं काम पुर्ण झालं आहे. लवकरच हे मंदीर दर्शनासाठी खुलं होणार आहे. 
 
एवढंच नव्हेतर अभिनेत्रीच्या नावे असलेल्या मंदिराचं नाव समांथा रुथ प्रभु या असं ठेवलं गेलं आहे. २८ एप्रिलला त्याच्या चाहत्यांच्या हस्ते या मंदिरांच भव्य ओपनिंग होणार आहे. चाहते या मंदिराच्या ऑफिशअल ओपनिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. सामंथाने केवळ साऊथमध्येच नाही तर तिच्या अभिनयाची जादू बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही पसरवली आहे. तिच्या दमदार अभिनयाने तिने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
 
मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी सामंथा किंवा तिच्या टीमकडून अद्याप यावंर  कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एवढंच नव्हेतर ज्या चाहत्यांने सामंथाच्या नावे मंदिर बांधलं आहे. तो चाहता अद्याप सामंथाला भेटलेला नाहीये. अभिनेत्रीच्या सेवाभावी कार्यावर आकर्शित होवून त्याने अभिनेत्रीसाठी मंदिर बांधलं असल्याचं बोललं जात आहे.

नुकताच सामंथा रुथ प्रभूच्या 'शाकुंतलम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाशिवाय समांथा ही दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत 'कुशी' या चित्रपटात दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत 'सिटाडेल' मध्ये दिसणार आहे.