पत्नीसोबतच्या Liplock मुळे चर्चेत आलेल्या सुपरस्टारवर लवकरच मोठी शस्त्रक्रिया

उपचारांसाठी थेट परदेशाची वाट

Updated: Dec 15, 2021, 10:54 AM IST
पत्नीसोबतच्या Liplock मुळे चर्चेत आलेल्या सुपरस्टारवर लवकरच मोठी शस्त्रक्रिया  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान अनेकदा कलाकारांना दुखापती होत असतात. पण, दुर्लक्ष केल्यामुळं या दुखापती इतक्या गंभीर होतात की आपण विचारही करु शकत नाही. सध्या एक सुपरस्टार अभिनेता याच साऱ्या परिस्थितीतून जात आहे. 

बहुविध चित्रपटांमधून भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता येत्या काही दिवसांमध्ये एका शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार आहे. 

एका साहसीदृश्याच्या चित्रीकरणादरम्यान जवळपास दोन वर्षांपूर्वी दुखापतग्रस्त झालेला हा अभिनेता आहे महेशबाबू. 

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपलं वेगळं अधिपत्य असणारा हा अभिनेता आता, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर स्पेनमध्ये गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी रवाना होणार आहे. 

सध्या दुबईमध्ये असणाऱ्या महेशबाबू याला शस्त्रक्रियेनंतर 2-3 महिने आराम करावा लागणार आहे. ज्यामुळं 'सरकारु वारी पाटा' या त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण टळलं आहे. 

सर्वप्रथम तो शस्त्रक्रियेसाठी युएसमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, आता मात्र तो स्पेनमध्ये जाणार असल्याचं कळत आहे. 

दरम्यान, महेशबाबू असा ना तसा कायमच चर्चेत असतो. पण, त्याची सर्वाधिक चर्चा रंगली होती ती एका फोटोमुळं. 'भारत अने नेनू' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यानं पत्नीला लिपलॉक करत एक फोटो शेअर केला होता. ज्याची चर्चा चांगलीच गाजली.