मुंबई : नवरात्री उत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू आहे. सगळेच नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोशात आणि थाटात साजरा करत आहेत. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. आपण मनोभावे देवीची पूजाअर्चा करतो. पण आपण ज्या देवीची पूजा करतो ती खूश आहे का? देवी लक्ष्मी म्हणजे साक्षात वैभव. पण या वैभवाची राखरांगोळी माणसानं केली. भ्रष्टाचार, काळ धन यांच्या माध्यमातून हेच वैभव तू डांबून ठेवलं आहेस.
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित नवरात्रीच्या मुहूर्तावर प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाचं वास्तवदर्शी चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर उभं करत आहे. ' कराग्रे वसते लक्ष्मी...अर्थात तुझ्या हातात माझा निवास आहे. संपत्तीचं सर्वात मोठं माझं वरदान मी तुझ्या हाती दिलं....पण तू मात्र त्याची राखरांगोळी केलीस...स्वतः ची तिजोरी अधिकाधिक भरण्यासाठी तुझी राक्षसी चढाओढ सुरू झाली.
मी सतत ‘फिरती’ राहणे हा माझा निसर्ग! मला डांबून ठेवून आयुष्य समृद्ध करणारं हे धन तू "काळं धन" करून अनेकांचा काळ ओढवला आहेस. तुझं हे लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलंय.... माझ्या सोनसळी वरदानाचं तू तुझ्या हातांनीच मातेरं केल आहेस...तूच मातेरं केल आहेस !
आजच्या या स्पर्धेच्या जगात मणुष्याला फक्त स्वत:ची खळगी भरायची आहे. माणसातली माणुसकी काळानुसार कमी होत आहे. आणि त्याच माणुसकीची जागा आता फक्त 'ये रे ये रे पैसा'नी घेतली आहे.