मुंबई : 'बिग बॉस 15' च्या विजेती तेजस्वी प्रकाशने रातोरात प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या जबरस्त अंदाजाने तिने लोकांना आपल्या प्रेमात पाडलं. तेजस्वी प्रकाशने बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यापासूनच तिच्या करण कुंद्रोसोबतच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. करण कुंद्रासोबतची तिची वाढती जवळीक लोकांचे लक्ष वेधून घेत होती. आजही चाहत्यांना तेजस्वी आणि करण यांना एकत्र पाहायला आवडते. पण आता तेजस्वी आणि करणचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगत आहे.
तेजस्वी प्रकाशने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तेजस्वीने 'मी ब्रेकअप केलं आहे, कारण मी डान्स केलाय...' असं लिहिलं आहे. तेजस्वीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तेजस्वी प्रकाशच्या पोस्टनंतर त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर तेजस्वी ब्रेकअप हा हॅशटॅग #Tejasswi ट्रेंड करत असून चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
तेजस्वी प्रकाशने गोव्यात घर घेतले आहे..
नुकताच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा गोव्याला गेले होते. करणने सोशल मीडियाद्वारे खुलासा केला होता की, तेजस्वीने गोव्यात घर खरेदी केलं आहे. घर खरेदी केल्याबद्दल करणला तेजस्वीचा खूप अभिमान होता आणि त्याने प्रत्येक शहरात घर असावे अशी प्रार्थनाही केली.