अविवाहीत नाही पत्रकार पोपटलाल ; ही आहे त्यांची खरी पत्नी

तारक मेहता का उल्टा चष्मा ही सब टी.व्ही. वरील मालिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात.

Updated: Mar 31, 2018, 11:14 AM IST
अविवाहीत नाही पत्रकार पोपटलाल ; ही आहे त्यांची खरी पत्नी title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा ही सब टी.व्ही. वरील मालिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यातील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार मालिकेत लग्नासाठी उतावीळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र काही केल्या त्याचे लग्न होत नाही. पण त्याचे लग्नाचे स्वप्नरंजन सुरुच आहे.

तो अविवाहीत नाही

पत्रकार पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठक करत आहे. खऱ्या आयुष्यात तो अविवाहित नाही तर विवाहित असून त्याला तीन मुले देखील आहेत.श्याम पाठक नॅशनल स्कूल ऑप ड्रामाचे विद्यार्थी आहेत. तिथेच त्यांना आपली जीवनसाथी रेश्मी भेटली. मग प्रेम फुलले आणि प्रेमाला त्यांनी विवाहबंधनात बांधले. श्याम पाठक यांना तीन मुले असून मोठ्या मुलाचे नाव पार्थ तर मुलीचे नाव नियती आहे. तर सर्वात लहान मुलाचे नाव शिवम आहे. 

हे आहे पत्रकार पोपटलाल उर्फ श्याम पाठक यांचे कुटुंब.

Meet Tarak Mehta Ka ulta Chashma's Popatlal Real Life Wife

Meet Tarak Mehta Ka ulta Chashma's Popatlal Real Life Wife

आता आशा आहे की मालिकेला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तरी पत्रकार पोपटलालला कोणतरी जीवनसाथी मिळेल. 

Meet Tarak Mehta Ka ulta Chashma's Popatlal Real Life Wife