चांगल्या कामासाठी पुढे सरसावल्या तापसी - भूमी

महिलांचे सशक्तिकरण त्याचप्रमाणे मुलींच्या भावी आयुष्यासाठी काम करणार आहेत. 

Updated: Oct 23, 2019, 02:42 PM IST
चांगल्या कामासाठी पुढे सरसावल्या तापसी - भूमी  title=

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर 'सांड की आखं' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दोघी शार्पशूटर प्रकाशी  तोमर आणि चंद्रो तोमर यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. आता तापसी - भूमी महिलांचे सशक्तिकरण त्याचप्रमाणे मुलींच्या भावी आयुष्यासाठी काम करणार आहेत. 

त्यांचे हे उद्देश साध्य करण्यासाठी दोघी 'प्लान इंडिया एनजीओ'सोबत काम करणार आहेत. 'या महान उद्देशासोबत काम करण्यास मी फार उत्सुक आहे. त्यांचे शिक्षण आणि त्यांना सशक्त बनवण्याचा आमचा मुळ हेतू आहे. आताच्या काळात महिला सशक्तिकरणाची फार गरज असल्याचं तापसीनं व्यक्त केलं आहे. 

भूमीने देखील आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. 'सांड की आखं चित्रपट पूर्णपणे महिला सशक्तिकरणावर आधारलेला आहे. मला फार आनंद आहे, येत्या काळात माझ्या हातून एक चांगले काम होणार आहे.' 

अनेक समस्यांवर मात करत प्रकाशी  तोमर आणि चंद्रो तोमर दोघांनी ३५२ मेडलवर आपले नाव कोरले. 'सांड की आँख' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजेच २५  ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.