करिनासोबत तैमुर पोहचला मेहबुब स्टुडिओत

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिचा लेक तैमुर अली खान यांची सतत मीडियामध्ये चर्चा होत असते. 

Updated: Mar 29, 2018, 09:51 PM IST
करिनासोबत तैमुर पोहचला मेहबुब स्टुडिओत  title=

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिचा लेक तैमुर अली खान यांची सतत मीडियामध्ये चर्चा होत असते. कधी तैमुरच्या नावावरून तर कधी तैमुरच्या नव्या फोटोवरून, पण जन्मापासूनच तैमुर अली खान हा अनेकांचा आवडीचा स्टार किड आहे. तैमुरचा नवा फोटो आला आणि तो सोशलमीडियामध्ये व्हायरल झाला नाही असे क्वचितच होते. 

 तैमुर मेहबूब स्टुडिओमध्ये   

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी संध्याकाळी करिना तैमुरला घेऊन मेहबुब स्टुडिओमध्ये पोहचली होती. एरवी बेबीसिटरच्या हातात असणारा तैमुर मेहबुब स्टुडिओच्या आवारात करिना कपूरच्या कंबरेवर होती. 

 

 

This IS THE CUTEST THING YOU'LL SEE TODAY

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

 

 

 

 

My jaans

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

 बेबोचं कमबॅक   

 करिना कपूर म्हणजेच बेबो गरोदरापणाच्या काळातही काम करत होती. तैमुरच्या जन्मानंतरही लगेजच करिना पुन्हा कामावर रूजू झाली होती. नियमित व्यायामाने करिना कपूरने वजन घटवले. 
  लवकरच करिना कपूर 'वीरे दी वेडींग' या चित्रपटातून पुन्हा कमबॅक करणार आहे. या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर प्रमुख भूमिकेत आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहे.