तैमूर अली खानच्या केअर टेकरचा पगार वाचून व्हाल थक्क

अशी झाली तैमूरच्या केअर टेकरची निवड 

तैमूर अली खानच्या केअर टेकरचा पगार वाचून व्हाल थक्क  title=

मुंबई : बॉलिवूडचा छोटा नवाब तैमूर अली खानचे सगळेच दिवाने आहेत. तैमूरच्या क्यूटनेसवर सगळेच फिदा आहेत. अशी एकही व्यक्ती नसेल ज्याला तैमूर अली खान आवडत नाही. अजून तैमूरने 5 वर्ष पण पूर्ण केले नाहीत पण त्याचे खूप चाहते आहेत. त्याच्या नावाने अनेक फॅन क्लब असून त्याचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला खूप उत्सुक असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Love my baby taimur #nannylife #iloveourfans

A post shared by Taimur Ali Khans Nanny Savatri (@taimurs_nanny) on

या सगळ्यात एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे तैमूरसोबत असलेली मावशी. अनेकदा तैमूरला घेऊन असलेली मावशी कॅमेऱ्यात कैद होते. तैमूरच्या सगळ्या गोष्टी वाचायला चाहत्यांना आवडतात. पण त्याला उत्तमपणे सांभाळणाऱ्या मावशीबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? तुम्हाला वाटतो तितका मावशीचा जॉब सोपा नाही. ती फक्त कॅमेऱ्यात दिसते पण त्यामागे तिची प्रचंड मेहनत आहे. मावशीचा पगार हा सामान्य व्यक्तीपेक्षा किती तरी पटीने अधिक आहे. तैमूरच्या मावशीचं नाव सावित्री असं आहे. तिचा पगार हा आताच्या हुशार इंजिनिअर्स, एमबीए आणि आयटी प्रोफेशनल असलेल्या व्यक्तींपेक्षा कितीतरी जास्त आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Taimur baba and Bebo

A post shared by Taimur Ali Khans Nanny Savatri (@taimurs_nanny) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It is very hard rocking and posing while babysitting Taimur

A post shared by Taimur Ali Khans Nanny Savatri (@taimurs_nanny) on

बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार सावित्रीला फक्त महिन्याचा चांगला पगारच नाही तर ओवर टाइम प्रोफेशल फी देखील दिली जाते. तसेच प्रवास करण्यासाठी तिला कायम ट्रवलिंग अलाऊन्स दिला जातो. तैमूरच्या मावशीला एका महिन्याचा दीड लाख पगार मिळतो. एवढंच काय तर ती तैमूरला सांभाळण्यासाठी घरी जास्त वेळ थांबली तर तिला 1 लाख 75 हजार पगार मिळतो. ओवर टाइम मिळून एवढा पगार मिळतो. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे एक  पर्सनल कार देखील आहे ज्यामधून त्या तैमूरला फिरायला घेऊन जातात. त्याचप्रमाणे करीना कपूर खान आणि सैफ अली खान कुठे परदेशात फिरायला गेले तर त्यांच्या लक्झरी ट्रव्हलसोहत नैनी देखील जाते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Tai Tai #taimuralikhan #taimuralikhanpataudi #kareenakapoorkhan #kareenakapoor #saifalikhan #kapoor

A post shared by Taimur Ali Khan Pataudi (@taimuralikhan_cutiepie) on

असं सांगितलं जातं की, जुहूत असलेल्या एका हाय प्रोफाइल एजन्सीद्वारे डोमेस्टीक हेल्पकरता करीना कपूरला सावित्रीचा रेफ्रन्स मिळाल आहे. सोहा अली खान आणि तुषार कपूरने देखील याच एजन्सीमधून मावशी हायर केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी कामाला लागणं ही सोपी गोष्ट नाही. त्या मावशीचं ब्रॅकग्राऊंड तपासल जातं. मेडिकल आणि फायनांसिअल बॅकग्राऊंड देखील तपासलं जातं. तैमूर कायमच मावशीच्या अंगा खांद्यावर खूष असतो.