प्रोटीन शेकमधून ब्रेस्ट मिल्क प्यायला ‘हा’ अभिनेता; पाहा पुढे काय झालं...

अनेकदा काही गोष्टी अनावधानाने आपल्याकडून घडून जातात आणि ... 

Updated: Oct 25, 2021, 03:07 PM IST
प्रोटीन शेकमधून ब्रेस्ट मिल्क प्यायला ‘हा’ अभिनेता; पाहा पुढे काय झालं... title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : अनेकदा काही गोष्टी अनावधानाने आपल्याकडून घडून जातात आणि त्याच गोष्टी इतरांच्या चेहऱ्यावर हसु आणतात. एका आघाडीच्या आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्याला या परिस्थितीचा सामना करावा लागला. ज्याचा खुलासा त्याच अभिनेत्याच्या पत्नीनं जाहीरपणे केला आहे. हा खुलासा अनेकांच्या भुवया उंचावून जात आहे.

हा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी म्हणजे, ताहिरा कश्यप. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या ताहिरानं हल्लीच तिचं एक पुस्तक सर्वांच्या भेटीला आणलं. ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ असं तिच्या पुस्तकाचं नाव. या पुस्तकामध्ये ताहिरानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक धमाल किस्सा सर्वांच्या नजरा वळवत आहे. सात महिन्यांच्या आपल्या मुलाला आई- वडिलांसोबत सोडून ताहिरा आणि आयुष्मान बँकॉकला गेले होते. त्यावेळी ताहिरा ब्रेस्ट मिल्क डिस्कार्ड करणं विसरून गेली. ज्यानंतर तिच्या लक्षात आलं की आयुष्मान ब्रेस्ट मिल्क प्रोटीन शेकमध्ये मिसळून प्यायला होता. ते फारच पौष्टीक होतं, योग्य तापमानावर होतं आणि प्रोटीन शेकमध्ये व्यवस्थित मिसळणारं होतं, असं उत्तर देत आयुष्यामाननं आपण ब्रेस्ट मिल्क पिण्याचं स्पष्टीकरण दिलं.

It's a girl'! Ayushmann Khurrana-Tahira Kashyap welcome new member to their  family

ताहिरा आणि तिच्यासोबत घडलेले किस्से बरेच रंजक आहेत. याचसंदर्भातील आणखी एक खुलासा तिनं हल्लीच एका मुलाखतीत केला. जिथं ती जेवणानंतर हॉटेलमधून निघताना आपल्या मुलाला सोबत घ्यायलाच विसरली होती. लोकं सहसा इतर लहानसहान वस्तू विसरतात, पण ताहिरा थेट तिचं बाळच विसरली ही बाब अनेकांनाच धक्का देऊन गेली.