Taarak Mehta Ka Ooltah Chasmah Sunder Wlaked For 75 km : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chasmah) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मते जिंकली आहे. दिशा वकानीचा (Disha Vakani) भाऊ सुंदर लालची भूमिका साकारणारा मयूर वकाणीविषयी (Mayur Vakani) एक मोठी बातमी समोर आली आहे. मयूरनं अहमदाबाद ते विठ्ठलपूर असा 75 किलोमीटरचा प्रवास त्यानं केला. मयुरनं असं करण्यामागचं कारण त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
मयूरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देवी चाचपी मॉंचा आशीर्वाद घेण्यासाठी पायी चालत गेल्याचे सांगितले. तो देवी चाचरी मा चा आशीर्वाद घेण्यासाठी पायी चालत गेला होता. त्यानं शेअर केलेल्या पोस्टवरून त्याच्या समर्पणाची आणि भक्तीचे सगळे कौतुक करत आहेत. मयुरनं व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले की 'जय माता जी. अहमदाबाद ते विठ्ठलपूर असा 75 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला.'
हेही वाचा : Video : सौदी अरेबियात उमराह केल्यानंतर Shahrukh Khan पोहोचला वैष्णोदेवीला
दरम्यान, जेव्हापासून दिशा वकानीनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून बाहेर पडल्यापासून तिचा भाऊ मयूर वकानी फारच कमी दिसतो. तर दुसरीकडे दिशा बराच काळ शोमध्ये दिसली नाही तर निर्माते तिच्याजागी दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे म्हटले जाते. मालिकेचे चाहते तिच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करत आहेत. (Taarak Mehta Ka Ooltah Chasmah Sunder As known as mayur vakani walked for 75 km for devis darshan)
पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, असित मोदी म्हणाले की 'दया भाभी हे असं पात्र आहे की प्रेक्षक विसरू शकत नाहीत. लोक चुकतात. मी दिशा वकानीचा आदर करतो, मी अजूनही प्रतिक्षा करत आहे आणि तिच्या परतीसाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण तिचं एक कुटुंब आहे आणि तिच्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. प्रेक्षकांप्रमाणे मीही वाट पाहत आहे.'