Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दयाबेन आहे करोडोंची मालकिण, Disha Vakani ची Net Worth वाचून व्हाल थक्क

मालिकेपासून दूर राहूनही दयाबेनची लोकप्रियता कायम 

Updated: Aug 17, 2021, 02:49 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दयाबेन आहे करोडोंची मालकिण, Disha Vakani ची Net Worth वाचून व्हाल थक्क  title=

मुंबई : Disha Vakani Net Worth : छोट्या पडद्यावरील  'तारक मेहता का उल्टा चष्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच पात्रांवर प्रेक्षक मनापासू प्रेम करतात. मात्र जेठालाल आणि दयाबेन यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अतिशय सुंदर आहे. (Taarak Mehta ka Ooltah Chasmah : Dayaben aka Disha Vakani net worth 2021 ) या कार्यक्रमात दयाबेनची भूमिका दिश वकानी अभिनेत्री साकारत आहे. अनेक काळ दिशा वकानीने या शोमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. 

17 ऑगस्ट 1978 मध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये दिशा वकानीचा जन्म झाला. 1997 साली दिशाने आपल्या करिअरची सुरूवात केली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी दयाबेन आज रॉयल लाइफस्टाइल जगत आहे.stardom1.com रिपोर्टनुसार, दिशा वकानी यांच्याकडे तब्बल 37 करोड रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, दयाबेन महिन्याला 15 ते 20 लाख रुपयांची कमाई करते. 

एका एपिसोडकरता दिशा 1.5 लीख रुपये चार्ज करते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून दिशा गायब झाली आहे. दिशा वकानी लक्झरी आणि महागड्या गाड्यांचा शौक आहे. तिच्याकडे BMW सारख्या गाड्या आहेत. दिशा मालिकांसोबत जाहिराती देखील करते. दिशाने 2017 साली लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून निरोप घेतला. तेव्हा ती आई झाली होती. त्यानंतर ती शोमध्ये पुन्हा आली नाही. अनेकदा कार्यक्रमाचे निर्माते आणि तिच्यामध्ये फीवरून वाद झाले आहे. महत्वाचं म्हणजे दयाबेनच्या भूमिकेकरता कोणत्या इतर चेहऱ्याला कास्ट करण्यात आलेलं नाही.