'तारक मेहता' शोच्या प्रेक्षकांसाठी नाराज करणारी बातमी

गेली 14 वर्षे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे

Updated: Jun 6, 2022, 01:55 PM IST
 'तारक मेहता' शोच्या प्रेक्षकांसाठी नाराज करणारी बातमी title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये, गेल्या 4 वर्षांत अनेक पात्रांनी निरोप घेतला आहे. आणि गेल्या एक महिन्यापासून येत असलेल्या बातम्यांनुसार, आता या शोची आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा हा लोकप्रिय शो सोडत आहे. आणि या त्यांचं नाव आहे शैलेश लोढा जे गेली 14 वर्षे मेहता साहेबांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पण आता त्यांनी शो सोडल्याची बातमी आहे.

निर्माते शैलेश लोढा यांना मनवण्यात प्रोड्यूसर व्यस्त
आता ताज्या मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, निर्माते शैलेश लोढाला शोमध्ये परत येण्यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सतत शैलेशला फोन करायचा प्रयत्न करत होता पण शैलेश लोढा त्याचा फोन रिसिव्ह करत नव्हते. एवढंच नाही तर बातमी अशी आहे की, शैलेशने आता शोमधील कलाकारांना फोन करणंही बंद केलं आहे. कारण ते कलाकार त्याला परत येण्यासाठी मनवत आहेत.
 
असं म्हटलं जात आहे की, शैलेश लोढा त्यांच्या नवीन करारावर खूश नव्हते. म्हणून त्यांनी शोला अलविदा करण्याचं ठरवलं. मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जात आहे की, त्यांनी गेल्या 1 महिन्यापासून शूट केलं नाही आणि जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तो शोच्या ताज्या एपिसोडमध्ये देखील दिसत नाहीये.

शोच्या टीआरपीला मोठा फटका  
दुसरीकडे, जर शैलेश लोढा सहमत झाले नाहीत आणि शोमध्ये परतले नाहीत तर यामुळे शोच्या टीआरपीला बरंच नुकसान होईल हे निश्चित आहे. याआधीच या शोमधील अनेक महत्त्वाच्या पात्रांनी शो सोडला आहे. दिशा वकानी, नेहा मेहता, गुरचरण सिंह, मोनिका भदौरिया यांनी या शोला अलविदा केलं असून आता या यादीत शैलेश लोढा यांचंही नाव जोडलं जाणार आहे.