'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत झाली 'ही' मोठी चूक...अखेर मागावी लागली माफी

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका वादावरून चर्चेत आली आहे, ज्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना अखेर प्रेक्षकांची माफी मागावी लागली आहे.

Updated: Apr 27, 2022, 08:06 AM IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत झाली 'ही' मोठी चूक...अखेर मागावी लागली माफी title=

मुंबईः छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही या मालिकेतून दिला जातो.

त्यामुळे प्रेक्षकांचं या मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळते.

या मालिकेतील प्रत्येक भूमिका ही रंजक आहे. मालिकेतील जेठालालची भूमिका ही प्रेक्षकांना जास्त भावते. या ना त्या कारणातून ही मालिका नेहमीच चर्चेत असते.

मात्र यावेळी एका वादावरून ही मालिका चर्चेत आली आहे, ज्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना अखेर प्रेक्षकांची माफी मागावी लागली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

या मालिकेच्या एका भागात लतादीदींनी गायलेल्या "ए मेरे वतन के लोगों' या गाण्याचं रिलीज तारीख चुकीची सांगण्यात आली होती.  त्यामुळे वादाला सुरुवात झाली होती त्यामुळे निर्मात्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

निर्मात्यांनी म्हटलं आहे की, मालिकेत आमच्याकडून अजानतेपणी 'ए मेरे वतन के लोगों' या गाण्याचं रिलीज वर्ष 1965 असा उल्लेख करण्यात आला आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही सांगू इच्छितो की,  'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं 26 जानेवारी 1963 रोजी रिलीज झालं होतं, त्यामुळे यापुढे आम्ही अशा चुका टाळण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्रेमाचा आम्ही आदर करतो.