टीव्ही इंडस्ट्रीच्या पगारावर 'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीचा संताप, म्हणाली इथे कायम.. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी टीव्ही शो 2008 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Updated: Jan 31, 2022, 04:12 PM IST
टीव्ही इंडस्ट्रीच्या पगारावर 'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीचा संताप, म्हणाली इथे कायम..  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी टीव्ही शो 2008 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या टीव्ही मालिकेत एकापेक्षा एक व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेत अंजली भाभीची भूमिका करणारी अभिनेत्री सुनैना फोजदारबद्दल सांगणार आहोत. सुनैना 2007 पासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि ती संतान, अदालत, रहना है तेरी पालकों की छांओं में, C.I.D आणि कुबूल है इत्यादीसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.

अलीकडेच सुनैना टीव्ही इंडस्ट्रीबद्दल मोकळेपणानं बोलली आहे. सुनैनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये वारंवार येणाऱ्या आर्थिक संकटाबद्दलही एक वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, टीव्ही इंडस्ट्रीतील आर्थिक संकट ही काही आजची गोष्ट नाही, मात्र ती बऱ्याच काळापासून सुरू आहे. फरक एवढाच आहे की, कोरोनाच्या काळात हे संकट अधिक वाढलं होतं.

सुनैना म्हणाली, ''बजेट, पेमेंट इत्यादी समस्या नेहमीच असतात. त्या आधीपासूनच आहेत''. सुनैना पुढे म्हणाली की, 'आता इंडस्ट्रीत अनेक कलाकार आहेत आणि शो कमी होत आहेत आणि अनेक ऑफ एअर झाले आहेत. अशा स्थितीत आर्थिक संकट कोसळणं स्वाभाविक आहे.

सुनैनाच्या म्हणण्यानुसार, तिने कधीच बजेट आणि पैशाचा फारसा विचार केला नाही. कारण काम करत राहणं जास्त महत्त्वाचं आहे यावर तिचा विश्वास आहे. अभिनेत्री म्हणते, 'बजेट कमी असूनही मी रिकामी घरात बसू शकत नाही. म्हणून मी प्रोजेक्ट्स घेतले आहेत. आम्हा अभिनेत्यांनी आमची कौशल्ये रोज चमकवत राहणं महत्त्वाचं आहे. बर्‍याचवेळा मी छोटे छोटे शो घेतले आहेत. ते फक्त माझ्यातील सर्जनशीलता जिवंत ठेवण्यासाठी.