या चिमुकलीला ओळखलं का? जिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या बाथरुम व्हिडीओनं घातला होता धुमाकूळ

जी तिच्या लव्ह लाईफमुळे खूपच चर्चेत आली होती.

Updated: Jan 31, 2022, 03:53 PM IST
 या चिमुकलीला ओळखलं का? जिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या बाथरुम व्हिडीओनं घातला होता धुमाकूळ title=

मुंबई : फोटोत दिसणारी ही गोंडस चिमुरडी गालावर बोटं लावून उभी आहे, ही मुलगी काल सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याआधीही ही मुलगी तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. नॅशनल टेलिव्हिजन चॅनेलवर तिचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ बिग बॉस 15 मधील होता. ज्यात ही मुलगी बॉयफ्रेंडसोबत बाथरुममध्ये दिसली आणि एकच चर्चा सुरु झाली.

बिग बॉस व्यतिरिक्त तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोन हिट मालिका, या हसीनाने तिच्या निरागसतेने आणि तिच्या धारदार शैलीने आपल्याकडे ओढले आहे.  या अभिनेत्रीने तिच्यासोबत उभे असलेल्या दोन सेलिब्रिटींना ही शर्यतीत पराभूत केले आहे. ही मुलगी दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आहे.

जी तिच्या लव्ह लाईफमुळे खूपच चर्चेत आली होती. नुकताच तिने बिग बॉस 15 चं विजतेपद पटकावलं आहे. तिने इतर स्पर्धकांना चांगलीच टक्कर दिली आहे. आता व्हायरल होणारा हा फोटो तेजस्वीच्या बालपणीचा आहे. ज्यात ती दात दाखवत हसताना दिसत आहे . 

Tejasswi Prakash Age, Height, Weight, Affairs, Biography, and More -  GrandPeoples Universe Of Peoples Biography

बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकण्याबरोबरच, तेजस्वी प्रकाश निर्माती एकता कपूरची नवीन नागीन देखील बनली आहे. ती नागीन या सिरिअलमध्ये दिसणार आहे.

ज्याचा प्रोमो समोर आला आहे. सलमान खानने उपस्थितांमध्ये कोण विजेता होणार हा प्रश्न विचारला असता बहुतेक लोकांनी करण आणि प्रतीक सहजपाल यांना या शोचे विजेते म्हणून सांगितले होते. पण प्रेक्षकांनी त्यांचा विजेता आधीच निवडला होता.